ब्रिटनमध्ये मुलांना कुख्यात ‘गुन्हेगारां’ची नावं
सीरियल किलर किंवा माथेफिरू एखाद्या मानसिक विकृतीमुळे लोकांची हत्या करतो. असे लोक समाजात वाईट उदाहरण मानले जातात. कुठल्याही प्रकारे या गुन्हेगारांचा मोठ्या होणाऱ्या मुलांवर प्रभाव पडू नये असे मानले जाते. तरीही ब्रिटनमध्ये लोक स्वत:च्या मुलांना नाव अशाच कुख्यात सीरियल किलरचे देत आहेत.
ब्रिटनमध्ये लोक स्वत:च्या होणाऱ्या मुलांसाठी अशी नावं निवडत आहेत, जी गुन्ह्यांनी प्रभावित आहेत. समाजासाठी चुकीचे उदाहरण मांडणारे खलनायक, गुंड आणि माथेफिरू लोकांनी नावांनी प्रभावित होत भावी माता-पिता स्वत:च्या मुलांची नावे ठेवण्याचा विचार करत आहेत. यासंबंधीचा खुलासा एका बेबीसेंटरच्या नामकरण अहवालातून झाला आहे.
अनेक नवजातांची नावं कुख्यात गुन्हेगारांनी प्रेरित
बेबीसेंटर युके आणि त्याच्या चालू वर्षातील अनेक शिशूंची नावं ही सामूहिक मारेकरी, सीरियल किलर आणि कुख्यात गुन्हेगारांच्या नावांनी प्रेरित उपनाम आहेत. या रक्तपात घडविण्याच्या प्रवृत्तीचा संबंध गुन्हेगारांनी कमी प्रेरित आणि हॉलिवूडच्या खलनायकांबद्दल अधिक कल दिसतो.
हॉलिवूडचा अधिक प्रभाव
बेबीसेंटरच्या अनेक शिशू नावं सत्य कहाणींवर आधारित हॉलिवूड चित्रपट किंवा माहितीपटात दाखविण्यात आलेल्या धोकादायक खलनायकाच्या नावाने अधिक प्रेरित आहेत. यातील काही तर अत्यंत कुख्यात राहिले आहेत. अशाप्रकारे मुलांचे नामकरण केल्याने एक गुन्हे संस्कृतीची झलक दिसून येते, जी अजाणतेपणी आमच्यात शिरली आहे. जर मुलांना अशीच नावं ठेवण्यात आली तर बहुतांश मुलांचे नाव कुठल्या न कुठल्या गुन्हेगाराशी संबंधित असेल असे तज्ञांचे सांगणे आहे.
2025 साठी बेबीसेंटरच्या आघाडीच्या 100 शिशू नावांमध्ये काही तशाच उपनामांची यादी देण्यात आली आहे, जी कुख्यात गुन्हेगारांनी प्रेरित आहे.
1 अन्ना : अन्ना डेल्वे (फेक हेयरिस)
2 आर्थर : आर्थ ली एलन (सस्पेक्टेड जोडिएक किलर)
3 बेला : बेले गिब्सनने प्रेरित (वेलनेस स्कॅमर)
4 एरिन : एरिन पॅटरसन (द मशरूम किलर)
5 फ्रेडी आणि रोज : सीरियल किलर जोडपे (फ्रेड अन् रोज वेस्टच्या कहाणीने प्रेरित)
6 जोसेफ : जो एक्सोटिक (टायगर किंग)
7 लुका : माहितीपट ‘डोंट फक विथ कॅट्स’ने प्रेरित
8 टेडी : सीरियल किलर टेड बंडीने प्रेरित एक उपनाम
9 रुबी : माहितीपट ‘डेव्हिल इन द फॅमिली : द फॉल ऑफ रुबी फ्रँक’ने प्रेरित
10 रॉनी आणि रेगी : कुख्यात लंडन गँगस्टर्स, क्रे ट्विन्स (त्यांना लीजेंड्स या चित्रपटात दर्शविण्यात आले)
चित्रपटांमधील गुन्हेगारी संस्कृती
ही नावं गुन्ह्यामुळे निवडली जात नसून बहुतांश आईवडिल अजाणतेपणी या नावांची निवड करतात. ही नाव मनोरंजक टीव्ही, पॉडकास्ट आणि व्हायरल सामग्रीद्वारे आमच्या मेंदून शिरकाव करतात. अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगारांच्या जीवनावरील चित्रपटाने प्रेक्षकांना गुह्यामागील पुरुष आणि महिलांविषयी नवा दृष्टीकोन प्रदान केलेला असतो. तसेच खलनायकांना चुकीचे समजले गेलेल्या हुतात्म्यांच्या स्वरुपात मानवीय रुप देण्यात आलेले असते असे मत बेबीसेंटरचे नामकरण तज्ञ आणि लेखक एसजे स्ट्रम यांनी व्यक्त केले आहे.