बिहारमध्ये आता मोदी अन् नितीश नगर
मंत्री रामसूरत राय यांची विधानसभेत घोषणा
वृत्तसंस्था /पाटणा
बिहारमध्ये नितीश अन् मोदी नगर वसविण्यात येणार आहे. ही नगरं प्रत्येक जिल्हय़ात असणार आहेत. भूमी सुधारणा मंत्री रामसूरत राय यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात याची घोषणा केली. भूमीहीनांना जमीन उपलब्ध करवून त्या ठिकाणाचे नाव नितीश आणि मोदी यांचे असणार आहे. बांका जिल्हय़ातून या योजनेची सुरुवात होणार असल्याचे राय यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी बिहार विधानसभेत विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले हेते. विरोधी पक्षांच्या आमदारांनी सभाध्यक्षांसमोरील मोकळय़ा जागेत येत गोंधळ घातला. तसेच या आमदारांनी पंतप्रधानांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या सभागृहात पंतप्रधानांच्या विरोधातील घोषणाबाजी चालणार नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. अग्निपथ योजनेवरून विरोधी पक्षाचे आमदार कामकाजात अडथळे आणत आहेत.