For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये,

06:44 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये
Advertisement

इशान किशन, कृणाल पंड्या तंबी, आधी रणजी खेळा मगच आयपीएलचा विचार करा 

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी रणजी ट्रॉफी खेळणे सक्तीचे केले आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी वेळ वाया घालवणाऱ्या ईशान किशन, कृणाल पंड्या आणि श्रेयस अय्यर, दीपक चहर यांना बीसीसीआयकडून रणजी ट्रॉफी खेळण्याच्या सुचना केल्या गेल्या आहेत. अलीकडे टीम इंडिया खेळून आलेल्या अनेक खेळाडूंनी एक प्रकारे रणजी क्रिकेटवर बहिष्कार टाकला होता. पण बीसीसीआय आणि राष्ट्रीय निवड समितीने आता याबाबत कडकपणा दाखवताना या खेळाडूंना तंबी दिली आहे.

Advertisement

ईशान किशन, कृणाल पंड्या आणि श्रेयस अय्यर या तिघांसह इतरही खेळाडू आहेत, जे सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत नाहीत. सध्या रणजी ट्रॉफीचा  हंगाम सुरु आहे. या प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत सर्व संघ आपल्या परीने चांगले प्रदर्शन करत आहेत. पण देशांतर्गत क्रिकेटच्या या थरारात अनेक खेळाडूंना सहभाग नाही आहे. मागील काही काळापासून बीसीसीआय या खेळाडूंवर लक्ष ठेवून आहे. आता अखेर क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय संघातून बाहेर असणाऱ्या सर्व खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळण्याच्या सुचना केल्या आहेत. या यादीत सर्वाधित चर्चेत नाव ईशान किशनचे आहे. ईशानने चालू रणजी हंगामातील एकही सामना खेळला नाही आहे. गतवर्षी व्यस्त असल्याचे कारण देत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून विश्रांती घेतली होती. यानंतर तो कोणत्याही स्पर्धेत सहभागी झालेला नाही.

खेळाडू केवळ आयपीएल किंवा राष्ट्रीय संघाला प्राधान्य देऊ शकत नाहीत, त्यांना देशांतर्गत क्रिकेटसाठी स्वत:ला उपलब्ध ठेवावे लागेल. आपल्या राज्याच्या संघाप्रती त्यांनी सन्मान दाखवला पाहिजे, असे बीसीसीआयमधील एका सूत्रांनी सांगितले आहे. अनेक खेळाडू जर भारतीय संघात नसतील तर रणजी, इराणी, दूलीप आदी स्पर्धा खेळणे टाळत असतात. अशा महत्वाच्या स्पर्धा टाळणाऱ्या खेळाडूंना किमान तीन ते चार रणजी सामने खेळणे बंधनकारक करावे लागेल अन्यथा त्यांना आयपीएलच्या लिलावात स्थान मिळणार नाही, असा नियम आम्हाला करावा लागेल, असा सज्जड दमही या पदाधिकाऱ्याने दिला. अर्थात ईशान किशनसह हा निर्णय श्रेयस अय्यर, कृणाल पंड्या, दीपक चहर यांच्यासह सर्वांना लागू असल्याचे ते म्हणाले.

टी 20 विश्वचषकासाठी बीसीसीआयचा खास प्लॅन

यंदाच्या टी 20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये केले जाणार आहे. या वर्षी जून महिन्यात हा वर्ल्डकप खेळला जाणार आहे. या विश्वचषकासाठी बीसीसीआय एक खास प्लॅन तयार करत आहे.  काही खेळाडूंना विश्वचषकासाठी आधीच न्यूयॉर्कला पाठवले जाऊ शकते. ज्या खेळाडूंचे संघ आयपीएलमधील प्लेऑफसाठी पात्र ठरू शकले नाहीत, त्या संघातील खेळाडूंना लवकर न्यूयॉर्कला पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  यामुळे अशा खेळाडूंना टी 20 विश्वचषकापूर्वी चांगली तयारी करण्याची संधी मिळू शकेल. आयपीएलच्या फायनलनंतर उर्वरित खेळाडू विश्वचषकासाठी रवाना होतील.

Advertisement
Tags :

.