For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आदर्श बाल विद्यालय’मध्ये के.के. मेनन

06:26 AM Jul 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘आदर्श बाल विद्यालय’मध्ये के के  मेनन
Advertisement

अमेझॉन प्राइम व्हिडिओवर लवकरच एक विनोदी धाटणीची वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. ‘आदर्श बाल विद्यालय’ नाव असलेल्या या सीरिजच्या प्रदर्शनाचा मुहूर्तही जाहीर करण्यात आला आहे. या सीरिजची एक झलक जारी करण्यात आली असून यात के.के. मेनन यांच्यासोबत अर्चना पूरन सिंह दिसून येत अहे.

Advertisement

के.के. मेनन यात एक बेजबाबदार मुख्याध्यापकाची भूमिका साकारत आहे. या सीरिजची कहाणी एका अव्यवस्थित सरकारी शाळा आणि त्याच्या खोडकर मुलांभवती गुंफण्यात आली आहे. प्रारंभी बेजबाबदार असलेले मुख्याध्यापक या अपयशी संस्थेला पूर्णपणे बदलण्याचा विडा उचलतात असे दाखविण्यात येणार आहे.

या सीरिजची कहाणी विस्वपति सरकार यांनी अक्षय अस्थाना, नुपूर पै, तत्सत पांडे आणि मेघना श्रीवास्तव यांच्यासोबत मिळून लिहिली आहे. हिमांक गौरकडून दिग्दर्शित ही सीरिज 24 जुलै रोजी अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये के.के. मेनन यांच्यासोबत अर्चना पूरन सिंह, नवीन कस्तूरिया, प्रसन्ना बिष्ट, अभिमन्यू सिंह, देवेन भोजानी, अजितेश गुप्ता, अन्नपूर्णा सोनी आणि प्राची शाह हे कलाकार दिसून येतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.