For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तानाजी गल्लीनजीक छाप्यात गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त

06:33 AM Mar 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
तानाजी गल्लीनजीक छाप्यात गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त
Advertisement

अबकारी विभागाची कारवाई, एकाला अटक

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात बेकायदा दारू थोपविण्यासाठी पोलिसांबरोबरच आता अबकारी अधिकारीही कामाला लागले आहेत. शनिवारी दुपारी तानाजी गल्ली येथील एका शेडवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे.

Advertisement

अबकारी विभागाचे उपअधीक्षक परमेश यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. तानाजी गल्ली क्रॉसजवळ असलेल्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू साठवून ठेवण्यात आली होती. याप्रकरणी मंजुनाथ मलगौडा गिडगेरी (वय 25) रा. पाचवा क्रॉस, महाद्वार रोड याला अटक करण्यात आली आहे.

हा साठा गोव्याहून आणणाऱ्या सुभाष सुधीर डे (वय 43) रा. महाद्वार रोड याच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या मंजुनाथने दिलेल्या माहितीनुसार अबकारी अधिकाऱ्यांनी सुभाषचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. शेडवजा घराच्या मालकाचाही शोध घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी या छाप्यात 224.70 लिटर गोवा बनावटीची दारू, 15 लिटर हुर्राक जप्त केले आहे. या दारूसाठ्याची किंमत साडेतीन लाख रुपये इतकी होते. कर्नाटक अबकारी कायदा 1965 चे कलम 14 व 15 चे उल्लंघन करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करून पुढील तपास करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू थोपविण्यासाठी सर्वत्र शोध घेण्यात येत आहे.

तपासनाके चुकविण्यासाठी अनेकांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच गोवा बनावटीची दारू साठविल्याची माहिती पोलीस व अबकारी विभागाला मिळाली असून या माहितीवरून अधिकारी कामाला लागले आहेत. अबकारी अधिकाऱ्यांनी सुभाष डे च्या दारू अड्ड्या वर यापूर्वीही अनेकवेळा छापे टाकले आहेत.

 दहा दिवसांत दोनदा कारवाई

21 मार्च रोजी मार्केट पोलिसांनी महाद्वार रोड, जुना पी. बी. रोडवरील बंगाली स्वीटमार्टच्या बोळात सुरू असलेल्या बेकायदा दारू अड्ड्यावर छापा टाकला होता. या कारवाईत 102 लिटरहून अधिक गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी सुभाष डे ला अटक झाली होती. या कारवाईनंतर केवळ दहा दिवसांत अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या अ•dयावर छापा टाकला आहे.

Advertisement
Tags :

.