इम्रान खान भूमीसोबत झळकणार
रोमँटिक-कॉमेडी धाटणीचा चित्रपट
अभिनेता इम्रान खान 2015 पासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. इम्रान आता एका नेटफ्लिक्स प्रोजेक्टसोबत पुनरागमन करणार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असेल, ज्याचे दिग्दर्शन दानिश असलम करणार आहे. दानिशनचे ‘ब्रेक के बाद’ या इम्रानच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर या बहुप्रतीक्षित चित्रपटात इम्रानची नायिका म्हणून भूमी पेडणेकर झळकणार आहे.
भक्षक आणि द रॉयल्सनंतर नेटफ्लिक्स इंडियासोबतचा हा तिचा तिसरा प्रोजेक्ट ठरणार आहे. चित्रपटाचय कथेवर सध्या काम केले जात आहे. मार्च महिन्यापर्यंत याचे चित्रिकरण सुरू करण्याची निर्मात्यांची योजना आहे. इम्रानचे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.
भूमी पेडणेकर लवकरच अमेझॉन प्राइम व्हिडिओवर क्राइम थ्रिलर ‘दलदल’मध्ये दिसून येणार आहे. यात ती एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. याचबरोबर कार्तिक आर्यनसोबत ती ‘पति, पत्नी और वो 2’चा हिस्सा असणार आहे. नेटफ्लिक्स सीरिज ‘द रॉयल्स’मध्ये देखील दिसून येणार आहे.