महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सेवा’च्या पीएमआयमध्ये सुधारणा

07:00 AM Nov 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

भारताच्या सेवा क्षेत्रातील वाढीला गेल्या महिन्यात वेग आला होता, तर सेवा क्षेत्रातील वाढ सप्टेंबरमध्ये मागील महिन्यात 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली होती. मागणीमुळे बाजार विस्तारामुळे सेवा क्षेत्रात सुधारणा झाली. बुधवारी एका खासगी व्यावसायिक सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. सर्व्हेक्षणानुसार सेवा क्षेत्रातील रोजगार निर्मितीतही सुधारणा झाली आहे. सेवा क्षेत्रासाठी पीएमआयचा परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) सप्टेंबरमध्ये 57.7 वरून ऑक्टोबरमध्ये 58.5 वर सुधारला. हा डेटा एस अॅण्ड पी ग्लोबलने संकलित केला होता. निर्देशांक सलग 39 व्या महिन्यात 50 च्या वर राहिला. हा निर्देशांक 50 पेक्षा जास्त वाढ दर्शवतो. सर्वेक्षणानुसार, ‘भागीदारांनी देशांतर्गत आणि परदेशातून चांगली मागणी नोंदवली.’ संपूर्ण भारताच्या सेवा अर्थव्यवस्थेत नवीन निर्यातीची मागणी वाढली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article