For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दूध वाढीसाठी सुधारित ‘कामधेनू’

12:48 PM Jul 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
दूध वाढीसाठी सुधारित ‘कामधेनू’
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची घोषणा : शेतकऱ्यांना दूध दरवाढीचे धनादेश वितरित

Advertisement

फोंडा : गोव्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कृषी, दूध उत्पादन, फलोत्पादन व पोल्ट्रीसारख्या पशुपालन व्यवसायात स्वयंपूर्ण व्हावे लागेल. राज्यातील दूध पुरवठ्याची वाढती मागणी लक्षात घेऊन उच्च शिक्षित युवकांनी दूधउत्पादन व्यवसायात लक्ष घातले पाहिजे. त्यासाठी सुधारित कामधेनू योजना सुऊ करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. या योजनेंतर्गत एका शेतकऱ्याला 20 गायी घेण्याची तरतूद असून पहिल्या दहा गायींवर 90 टक्के तर उर्वरित दहा गायींवर 75 टक्के सवलत मिळणार आहे.

गोवा डेअरीला दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या दूध दरवाढीचे धनादेश वितरित करण्यासाठी फोंडा येथे गुऊवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. राजीव गांधी कलामंदिरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात गोवा डेअरीशी संलग्नीत साधारण 170 स्थानिक दूध सोसायट्यांना प्रातिनिधिक स्वऊपात हे धनादेश वितरित करण्यात आले. गायीच्या दुधावर प्रतिलिटरमागे ऊ. 6 तर म्हशीच्या दुधावर ऊ. 10 या प्रमाणे राज्यभरातील साधारण 4500 शेतकऱ्यांना ही दरवाढ एप्रिल महिन्यापासून लागू होणार आहे.

Advertisement

दूध उत्पादनात दुपटीने वाढ अपेक्षित

व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर, राजीव गांधी कलामंदिरचे अध्यक्ष रितेश नाईक, गोवा डेअरीचे प्रशासकीय अध्यक्ष पराग नगर्सेकर, पशुसंवर्धन खात्याचे संचालक नितीन नाईक व सहकार निबंधक आशुतोष आपटे हे उपस्थित होते. सध्या राज्यात दुधाची मागणी प्रतिदिनी साडेचार लाख लिटर एवढी आहे. मात्र गोव्यातील शेतकऱ्यांकडून केवळ 60 हजार लिटर दूध पुरवठा होतो. त्यात दीड लाख लिटरपर्यंत वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. अन्य दुग्धजन्य पदार्थही गोव्यातच तयार व्हावेत यासाठी गोमंतकीयांनी पुढाकार घ्यावा. दूधासह, फळे व भाजीपाला इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात आयात करावा लागत आहे.

दैनंदिन गरजेच्या या जीवनावश्यक वस्तू गोव्यातच उत्पादीत झाल्यास राज्यातील  अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. ज्यांच्या कुटुंबात दूध उत्पादन केले जाते, त्यांनी त्यात वाढ करावी तसेच उच्च शिक्षित तऊणांनी अशा व्यवसायात येण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. गोवा डेअरीवर प्रशासक नियुक्त केल्यापासून येथील कारभार सुरळीत चालत आहे. शेतकऱ्यांना दूध दरवाढ मिळाली असून दर फरकही दर महिन्याला बँक खात्यात जमा होणार आहे. गुरांची निगा योग्य प्रकारे व्हावी, त्यांना वेळोवेळी उपचार मिळावेत यासाठी पशुसंवर्धन खात्यामार्फत चोवीस तास तत्पर ऊग्णवाहिका व पशुचिकित्सक गोठ्यापर्यंत पोचविणारी सेवाही लवकरच सुऊ होणार आहे. गुरांच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दूध उत्पादनाला औद्योगिक स्वऊप द्यावे : नीळकंठ हळर्णकर

मंत्री निळकंठ हळर्णकर म्हणाले, राज्यातील दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी गोवा डेअरीच्या माध्यमातून सरकार नेहमीच शेतकऱ्यांना सहकार्य करीत आले आहे. पशुसंवर्धन खात्यामार्फतही गुरांच्या देखभालीसाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न आहे. तऊणांनी दूध व पशुपालन व्यावसायात येऊन या पारंपरिक व्यावसायाला औद्योगिक स्वऊप देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

हिरवा चारा लागवडीचा प्रस्ताव : शिरोडकर

गोवा डेअरीशी संलग्नीत स्थानिक दूध सोसायट्यांनी व्यावहारात संगणकीय सुधारणा घडवून आण्याचे आवाहन मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले. गोवा डेअरीनेही आर्थिक व्यावहार व अन्य तांत्रिक गोष्टीकडे प्रभावीपणे लक्ष द्यावे. सहकाराच्या वृद्धीसाठी व ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी दूध उत्पादनात सुधारणी ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या गुरांना लागणारा हिरवा चारा लावण्यासाठी डेअरीच्या कोपर्डे येथील फार्मची जागा उपलब्ध झाल्यास जलस्रोत खात्यामार्फत मुबलक प्रमाणात हिरवा चारा लावण्याचा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. नितीन नाईक यांनी स्वागत तर नितीन कोलवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Advertisement
Tags :

.