For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ashok Kharat | भोंदू' अशोक खरातची आता 'ईडी' चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये मोठी घोषणा

05:36 PM Apr 06, 2026 IST | NEETA POTDAR
ashok kharat   भोंदू  अशोक खरातची आता  ईडी  चौकशी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये मोठी घोषणा
Advertisement

                . 'त्या' बेकायदेशीर सीडीआर प्रकरणाचीही चौकशी होणार

Advertisement

नाशिक -नाशिकच्या भोंदू अशोक खरात मागे सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा लागणार आहे. या वृत्ताला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे.

दोन दिवसांपासून नाशिकमधील तपोवन येथे अखिल भारतीय संत समिती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या समारोपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिकमध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी खरातच्या मालमत्तेवरकरण्यात येणाऱ्या कारवाईबाबत महत्वाची माहिती दिली.

Advertisement

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, खरात प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. त्याच्या संपत्तीची आणि बँकेच्या व्यवहाराची सगळी माहिती एसआयटीकडे आहे. त्यानंतर आता ईडीकडून खरातच्या संपत्तीची चौकशी केली जाणार आहे. त्याने अनेक पतसंस्था आणि बँकांमध्ये आर्थिक व्यवहार केले आहेत. या पतसंस्था आणि बँकांमधून त्याने करोडोंचे व्यवहार केले असून, हे सर्व व्यवहार संशयास्पद आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

'त्या' सीडीआरची देखील चौकशी होणार
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अशा प्रकारचा सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. तो फक्त जी काही तपास यंत्रणा आहे. तपास करत आहेत त्यांना तो अधिकार आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा हा सीडीआर कशा पद्धतीने लीक झाला, तो कोणी लीक केला,सगळी पाळंमुळं खोदल्याशिवाय आम्ही राहणार नाही

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अशोक खरात प्रकरणातला संपूर्ण तपास आम्ही करणार आहोत. त्याने जी वेगवेगळी खाती उघडली आहेत, तेही आमच्या लक्षात आले आहे. त्याने जे व्यवहार केले आहेत, तेही आमच्या लक्षात आले आहेत. आता लोकांचा विश्वास वाढल्याने ते स्वतः समोर येऊन माहिती देत आहेत. एसआयटीकडे भरपूर माहिती जमा झाली आहे. त्यामुळे सगळी पाळंमुळं खोदल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा थेट इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.

या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.कोण कोणाशी बोलले, कोणी कोणाशी काय केले याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टीस सिस्टमचालत नाही, अशोक खरातने केलेली अ जी काही घाणेरडी कामे आहेत, अ यात जर कोणी सामील असेल तर द कोणालाही आम्ही सोडणार नाही, रु असा इशारा त्यांनी पुन्हा दिला.

Advertisement
Tags :

.