महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोठ्या संख्येत पर्यटकांना हाताळणे अशक्य

06:29 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लक्षद्वीपच्या खासदारांकडून चिंता व्यक्त : बेटावर केवळ 150 हॉटेल रुम्स

Advertisement

वृत्तसंस्था/ लक्षद्वीप

Advertisement

भारत-मालदीव वादानंतर सोशल मीडियावर चलो लक्षद्वीप मोहीम राबविली जात आहे. यामुळे लक्षद्वीपमधील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान लक्षद्वीपच्या खासदाराने हे बेट मोठ्या संख्येत पर्यटकांना झेलू शकत नसल्याचे म्हटले आहे. येथे केवळ 150 हॉटेल रुम्स असून फ्लाइट्सचे प्रमाणही कमी असल्याचे त्यांनी नमूद पेले आहे.

हॉटेल रुम्स आणि फ्लाइट्सची संख्या वाढविण्यात आली तरीही येथे मोठ्या संख्येत पर्यटक येऊ शकत नाहीत, कारण येथील पर्यावरण अत्यंत संवेदनशील आहे. इंटीग्रेटेड आयलँड मॅनेजमेंट प्लॅनच्या आधारावरच येथे आम्ही विकास करतो. या प्लॅनचा उल्लेख न्यायाधीश रविंद्रम आयोगाच्या अहवालात आहे. या आयोगाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर लक्षद्वीपच्या विकासासाठी स्थापन करण्यात आले होते अशी माहिती खासदार मोहम्मद फैजल यांनी दिली आहे.

आयोगाच्या सल्ल्यानुसार आम्ही लक्षद्वीपमध्ये पर्यटकांचा महापूर यावा असे इच्छित नाही. आम्ही कमी पर्यटकांच्या मदतीने उत्पन्न मिळविण्यावर भर देत आहोत. येथील पर्यावरणाला नुकसान पोहोचविणार नसल्याची खात्री येथे येणाऱ्या लोकांना द्यावी लागणार असल्याचे मोहम्मद फैजल म्हणाले

10 बेटांवरच वस्ती

लक्षद्वीप एकूण 36 बेटांचा समूह असून यातील केवळ 10 बेटांवर वस्ती आहे,  कवरत्ती, अगत्ती, अमिनी, कदमत, किलातन, चेतलाट, बिट्रा, आनदोहृ कल्पनी आणि मिनिकॉय येथे नागरी वस्ती आहे. बिट्रामध्ये 271 तर बंगारममध्ये 61 लोकांचे वास्तव्य आहे. उर्वरित 26 बेटे ही निर्जन आहेत. लक्षद्वीपमध्ये पर्यटन उद्योग वाढत असला तरीही आजही मुख्य उपजीविका ही मासेमारी आणि नारळाच्या उत्पन्नातून होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article