For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हमासला संपविणे अशक्य : इस्रायल सैन्य

06:48 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
हमासला संपविणे अशक्य   इस्रायल सैन्य
Advertisement

सैन्य अन् नेतान्याहू यांच्यातील मतभेद उघड

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

गाझापट्टीत आठ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून लढाई सुरू असूनही इस्रायलला अपेक्षेनुसार यश मिळाले नाही. याचा नकारात्मक प्रभाव देशाच्या सैन्यातील वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या संबंधांवर दिसू लागला आहे. हमासला पूर्णपणे संपविणे शक्य नसल्याचे वक्तव्य इस्रायलच्या सैन्याच्या प्रवक्त्याने  केले आहे. या वक्तव्यामुळे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासचा पूर्ण खात्मा होईपर्यंत युद्ध सुरूच राहणार असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Advertisement

हमासला पूर्णपणे संपविता येईल असे म्हणणे म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखे ठरेल. गाझामध्ये कुठलाही दहशतवादी नसेल, कुठलीच सशस्त्र संघटना नसेल,  कुठलेच रॉकेट नसेल हे लोकांना सांगणे  खोटे ठरणार आहे. हमास एक विचार असून तो गाझाच्या रहिवाशांच्या मनात खोलवर शिरलेला आहे असे इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे प्रवक्ते रीड अॅडमिरल डॅनियल हागारी यांनी नमूद केले आहे.  हागारी यांच्या या टिप्पणीमुळे आता खळबळ उडाली आहे. कारण पंतप्रधान नेतान्याहू यांनी या युद्धाचा उद्देश हमासचा पूर्ण खात्मा करणे असल्याचा दावा केला होता.

वाद उभा ठाकल्यावर आयडीएफने सरकारच्या युद्धासंबंधीच्या लक्ष्यांबद्दल प्रतिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. हागारी यांनी केवळ एक विचारसरणी म्हणून हमासच्या अस्तित्वाबद्दल विचार मांडल्याचा दावा आयडीएफने केला आहे. आयडीएफच्या स्पष्टीकरणानंतरही इस्रायल सरकार आणि सैन्यामधील मतभेद ठळकपणे समोर येत आहेत.  नेतान्याहू यांच्यावर मंत्रिमंडळातील सदस्य तसेच अमेरिकेसमवेत मित्रदेशांकडून गाझासाठी एक रणनीति तयार करण्यासाठी दबाव वाढत आहे.

Advertisement
Tags :

.