For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयात केलेल्या मर्सिडीज-बीएमडब्लू कार होणार स्वस्त

06:37 AM Jan 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयात केलेल्या मर्सिडीज बीएमडब्लू कार होणार स्वस्त
Advertisement

युरोपियन कारवरील शुल्क  110 टक्केवरुन 10 पर्यंत होणार कमी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

युरोपमधून आयात केलेल्या कार भारतात स्वस्त होणार आहेत. भारत सरकारने युरोपमधून येणाऱ्या कारवरील आयात शुल्क 110 टक्केवरून 10 टक्केपर्यंत कमी केले आहे. दरम्यान, सरकारने यासाठी वार्षिक 2.5 लाख वाहनांची मर्यादा निश्चित केली आहे. हा निर्णय भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार कराराचा एक भाग आहे.

Advertisement

भारत-ईयू शिखर परिषदेत जाहीर करण्यात आला. 20 वर्षांच्या दीर्घ वाटाघाटीनंतर, दोन्ही पक्षांनी हा करार अंतिम केला आहे. तो 2027 पर्यंत लागू केला जाईल. भारतात मर्सिडीज बेंझ आणि बीएमडब्ल्यूच्या बहुतेक लोकप्रिय कार सुरुवातीला स्थानिक असेंब्लीद्वारे तयार केल्या जातात. म्हणजेच, भाग येथे आयात आणि असेंब्ली केले जातात. यावरील आयात शुल्क फक्त 15-16.5 टक्के आहे, त्यामुळे ईयूसोबतच्या एफटीएमुळे त्यांच्या किमतीत कोणताही मोठा बदल होणार नाही.

ऑडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज स्वस्त

भारत आणि युरोपियन युनियनने जारी केलेल्या निवेदनानुसार, कारवरील कर हळूहळू 110 टक्केवरून 10 टक्के पर्यंत कमी केले जाणार आहेत. यामुळे ऑडी, मर्सिडीज-ब्रेंझ आणि बीएमडब्ल्यू सारख्या उच्च-स्तरीय विशेष मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत स्वस्त होणार असल्याची शक्यता अधिक आहे. पण ही सवलत अमर्यादित राहणार नाही. सरकारने एक कोटा प्रणाली लागू केली आहे, ज्या अंतर्गत हा कमी कर वर्षभर फक्त 2.50 लाख वाहनांवर लागू होईल. त्याचवेळी, इलेक्ट्रिक वाहनांना पहिल्या 5 वर्षांसाठी शुल्क कपातीपासून दूर ठेवले जाईल, जेणेकरून टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या देशांतर्गत खेळाडूंना संरक्षण मिळेल. त्यानंतर ही कपात त्याला लागू होऊ शकते.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कार बाजार

विक्रीच्या बाबतीत भारत सध्या अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरा सर्वात मोठा कार बाजार आहे. तथापि, भारतातील 4.4 लाख युनिट वार्षिक कार विक्री बाजारात युरोपियन युनियन उत्पादकांचा वाटा 4 टक्केपेक्षा कमी आहे. असे असूनही, भारताने आपल्या ऑटो क्षेत्राला बऱ्यापैकी संरक्षित ठेवले होते. जास्त करामुळे विदेशी कंपन्यांना त्यांच्या महागड्या कार भारतीय बाजारात विकणे कठीण झाले होते.

Advertisement
Tags :

.