अमेरिकेसोबत महत्त्वाच्या खनिजांवर होणार चर्चा
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची माहिती : 3 ऑक्टोबरपर्यंत अमेरिकेत
नवी दिल्ली :
केंद्रीय मंत्री पियुष गोयल 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत अमेरिकेसोबत महत्त्वाच्या खनिजांवर चर्चा करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. अत्यावश्यक खनिजांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि अमेरिका करारावर वाटाघाटी करत आहेत. या आठवड्यात वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्या वॉशिंग्टन भेटीदरम्यान हा मुद्दा समोर येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या अर्थमंत्री जीना रायमोंडो यांच्या निमंत्रणावरून गोयल 30 सप्टेंबरला रवाना झाले असून ते 3 ऑक्टोबरपर्यंत तेथे असणार आहेत.
गोयल आणि रायमोंडो भारत आणि अमेरिका यांच्यातील महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी विस्तृत आणि वैविध्यपूर्ण करण्यासाठीच्या पावलांवरही चर्चा करतील, असे वाणिज्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. दोन्ही पक्ष एक सामंजस्य करारावर वाटाघाटी करत आहेत. ज्याचे उद्दिष्ट द्विपक्षीय सहकार्य वाढवणे आणि अत्यावश्यक खनिज पुरवठा साखळी वाढवणे हा असून त्यासोबत साखळी वैविध्यपूर्ण करणे आणि त्यांच्या पूरक शक्तींचा लाभ घेणे हा आहे.