For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिलारीचे पाणी बेळगावला आणण्याबाबत उद्या महत्त्वपूर्ण बैठक

07:58 AM Aug 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
तिलारीचे पाणी बेळगावला आणण्याबाबत उद्या महत्त्वपूर्ण बैठक
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बेळगाव शहराला तिलारी धरणाचे पाणीपुरवठा करण्याबाबत शनिवार दि. 22 रोजी सकाळी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचीही उपस्थिती राहणार आहे. तिलारीचे पाणी राकसकोप जलाशयात वर्गीकरण केल्यास बेळगाव शहराच्या पाणीप्रश्नावर तोडगा निघू शकतो. तसेच या पाण्याचा लाभ कर्नाटक व महाराष्ट्रातील काही गावांनाही मिळून तेथील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तिलारीचे पाणी राकसकोपमध्ये आणण्याच्या प्रस्तावावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

बेळगाव शहराची वाढती लोकसंख्या व भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता, शहरासाठी अतिरिक्त जलस्रोत उपलब्ध होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर तिलारीचे पाणी राकसकोप जलाशयात आणण्याचा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे. पाणीवाटप व त्याच्या उपलब्धतेबाबत बैठकीत विविध बाबींवर चर्चा होणार आहे. दरम्यान माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवाजी सुंठकर व दीपक वाघेला यांनी केले आहे. बेळगाव शहरासह सीमाभागातील गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.