For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कॅन्टोन्मेंटची शुक्रवारी महत्त्वाची बैठक

07:45 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॅन्टोन्मेंटची शुक्रवारी महत्त्वाची बैठक
Advertisement

रस्त्यांच्या हस्तांतरणावर चर्चेची शक्यता

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डची मासिक बैठक शुक्रवार दि. 6 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. रस्त्यांची दुरुस्ती, पेन्शनर्सच्या प्रलंबित मागण्या, पार्किंगच्या निविदा, रेल्वेस्टेशन येथील दुकानगाळे, महसूल आकारणी यासह इतर विषयांवर चर्चा होणार आहे.

Advertisement

विशेष म्हणजे या बैठकीवेळी कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांच्या आर्मीकडे हस्तांतरणाबाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर अवजड वाहतूक रोखण्यासाठी मध्यंतरी मांडण्यात आलेल्या लोखंडी कमानींच्या प्रस्तावावरही चर्चा होणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.