For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गंभीर, आगरकर, लक्ष्मण यांची बीसीसीआयसोबत आज महत्त्वाची बैठक

06:00 AM Sep 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
गंभीर  आगरकर  लक्ष्मण यांची बीसीसीआयसोबत आज महत्त्वाची बैठक
Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

भारतीय क्रिकेट संघाच्या अलीकडील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना गुऊवारी (3 सप्टेंबर) मुंबईत बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीत संघाच्या निराशाजनक कामगिरीपासून खेळाडूंच्या फिटनेसपर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. भारतीय क्रिकेटच्या पुढील वाटचालीसाठी रोडमॅप तयार करण्यावरही बैठकीत भर दिला जाणार आहे.

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे बीसीसीआयची चिंता वाढली आहे. भारताने श्रीलंकेविऊद्धची कसोटी मालिका 1-0 अशी जिंकली असली तरी कोलंबोतील दुसऱ्या कसोटीत पाचव्या दिवशी श्रीलंकेला ऑलआउट करण्यात भारताला अपयश आले. त्यामुळे पुढील वषी होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पयिनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या संधींना धक्का बसला आहे.

Advertisement

यापूर्वी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी भारताच्या परदेशातील कामगिरीचा आढावा घेतला जाईल, असे सांगितले होते. मात्र, काही कारणांमुळे ही बैठक लांबणीवर पडली होती. भारताला यावषी टी-20 क्रिकेटमध्ये सलग दोन मालिकांमध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. टी-20 विश्वविजेत्या भारताचा आयर्लंडने 2-0 असा पराभव केला तर इंग्लंडने 4-0 अशी मालिका जिंकली. इंग्लंडविऊद्धच्या एकदिवसीय मालिकेतही भारताला 2-1 असा पराभव पत्करावा लागला.

सेंटर ऑफ एक्सलन्सच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

बेंगळूर येथील सेंटर ऑफ एक्सलन्सच्या कामकाजावरही बीसीसीआयच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्मयता आहे. जसप्रित बुमराह आणि हार्दिक पंड्यासारखे प्रमुख खेळाडू दुखापतीतून अपेक्षित वेळेत पूर्णपणे सावरू शकलेले नाहीत. खेळाडू, सेंटर ऑफ एक्सलन्स आणि निवड समिती यांच्यातील संवादातील त्रुटीही समोर आल्या आहेत. काही प्रसंगी खेळाडूंच्या फिटनेसबाबत निवड समितीला योग्यवेळी माहिती मिळाली नसल्याचे वृत्त आहे. जसप्रित बुमराह दौऱ्यासाठी तंदुऊस्त नसल्याची माहिती निवड समितीला वेळेवर देण्यात आली नव्हती. वॉशिंग्टन सुंदरही दुखापतीमुळे बाहेर पडला,तर साई सुदर्शनला फिटनेस मिळवण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला.

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी चार खेळाडूंची फिटनेस टेस्ट

दिल्ली येथे होणाऱ्या अफगाणिस्तानविऊद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताच्या 15 सदस्यीय संघात जसप्रित बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रे•ाr आणि हर्षित राणा यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, फिटनेसच्या कारणामुळे या चौघांच्या सहभागाबाबत अद्याप अनिश्चितता आहे. या खेळाडूंची 9 सप्टेंबर रोजी सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणी होणार आहे. त्यानंतरच अफगाणिस्तान मालिकेसाठी त्यांच्या उपलब्धतेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. न्यूझीलंडविऊद्धच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका पुढील महिन्यात सुरू होणार असल्याने भारतीय वेगवान गोलंदाजांचा फिटनेस कायम राखणे, दुखापतींचे प्रमाण कमी करणे आणि खेळाडू-निवड समिती-सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्यातील समन्वय सुधारण्यासाठी बीसीसीआय या बैठकीत ठोस निर्णय घेण्याची शक्मयता आहे.

2027 विश्वचषकासाठी आतापासूनच तयारी

भारताचा न्यूझीलंड दौरा यावषी होणार असून 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या फिटनेस व्यवस्थापनावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. आयपीएलमधील वाढत्या वर्कलोडचा खेळाडूंच्या फिटनेसवर होणारा परिणामही बैठकीत चर्चिला जाण्याची शक्मयता आहे. संघ व्यवस्थापनाने यापूर्वीच महत्त्वाच्या मालिकांपूर्वी खेळाडू पूर्ण क्षमतेने उपलब्ध नसल्याबाबत बीसीसीआयकडे चिंता व्यक्त केली आहे.

हार्दिक पंड्याच्या फिटनेसची मोठी चिंता

हार्दिक पंड्याचा फिटनेस बीसीसीआयसमोर मोठा प्रश्न बनला आहे. मे 2026 मध्ये आयपीएलमध्ये अखेरचा स्पर्धात्मक सामना खेळल्यानंतर तो अद्याप पूर्ण क्षमतेने पुनरागमन करू शकलेला नाही. सध्या तो एकदिवसीय सामन्यात केवळ 5 ते 6 षटके गोलंदाजी करण्याइतकेच कामाचे प्रमाण वाढवू शकला आहे. पुढील वषीच्या एकदिवसीय विश्वचषकात हार्दिकची भूमिका महत्त्वाची राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे त्याचा फिटनेस बीसीसीआय आणि निवड समितीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.