For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जीएसटी परिषदेची महत्त्वाची बैठक 12 सप्टेंबरला

06:27 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
जीएसटी परिषदेची महत्त्वाची बैठक 12 सप्टेंबरला
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

जीएसटी अर्थात वस्तु व सेवा करसंबंधीत परिषदेची महत्त्वाची बैठक येत्या 12 तारखेला आयोजीत करण्यात आली आहे. सदरच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली जाणार आहे.

12 सप्टेंबरला जीएसटी परिषदेची 57 वी बैठक होत असून याआधी म्हणजेच 11 सप्टेंबरला अधिकाऱ्यांची बैठक आयोजीत केली गेली आहे. व्यावसायिकांना दिलासा देण्यासंबंधी बैठकीत निर्णय होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. उद्योजकांकडून दीर्घकाळापासून इनपुट टॅक्स क्रेडिट संबंधीत सवलतीची मागणी होत आहे त्यावर निर्णय अपेक्षीत आहे. मोटर वाहन, खाणेपिणे, बाह्या केटरिंग, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिस, क्लब मेंबरशिप आणि काही ट्रॅव्हल लाभावरील टॅक्स क्रेडिट न मिळणे यासारख्या मुद्यांवर चर्चा होईल. क्रेडिट न मिळाल्यामुळे कंपन्यांचा खर्च वाढत आहे. नियमात ढील दिली गेल्यास कंपन्यांच्या रोखीवतेत सुधारणा होऊ शकते, असे कंपन्यांचे म्हणणे आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.