महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोवा संस्कृती संवर्धनात ‘मराठी’ चे महत्त्वाचे योगदान

11:50 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भालचंद्र केळूसकर यांचे प्रतिपादन :होंडा येथील मराठी व सांस्कृतिक संमेलनात दिंडीला उस्फूर्त प्रतिसाद, माजी सैनिकांचा सत्कार

Advertisement

वाळपई/ होंडा

Advertisement

मराठी ही ज्ञानाची, वेदकालीन भाषा आहे. मराठी सारखी शतकी संपन्न भाषा दुसरी कुठलीही नाही. यामुळे मराठीचा जयजयकार होणे अत्यंत गरजेचे आहे. मराठी भाषेने गोव्याच्या सांस्कृतिक संवर्धनात महत्त्वाचे योगदान दिले आहे. या भाषेवरच आज गोमंतकाचा पिंड पोसलेला आहे. ग्रामीण भागामध्ये या भाषेच्या माध्यमातून सुशिक्षित व सुसंस्कृत समाज रचनेचा पाया रचला गेला. आज गोमंतकामध्ये सुशिक्षित व सुसंस्कृत समाज निर्माण करण्याची प्रक्रिया मराठी भाषेतूनच झाली हे आपण विसरता कामा नये. म्हणूनच मराठीत शिका, मराठीत लिहा व मराठीत अभ्यास करा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनसम्राट भालचंद्रबुवा केळुस्कर यांनी होंडा येथे केले.

गोवा मराठी अकादमी मराठी संस्कार केंद्र होंडा व आजोबा देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेल्या मराठी मेळावा व सांस्कृतिक संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अशोक वझे, प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार परेश प्रभू, स्वागताध्यक्ष होंडा पंचायतीचे सरपंच शिवदास माडकर, सन्माननीय अतिथी व मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, गोवा मराठी अकादमीचे सदस्य व तालुका समन्वयक आनंद मयेकर, सभासद चंद्रकांत कृष्णा गावस, तालुका समितीचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती नरहरी हळदणकर, तालुका समितीचे सचिव रामकृष्ण गावस, आयोजन समितीचे कार्याध्यक्ष राघोबा परब, सचिव जयसिंग पाटील, मराठी संस्कार केंद्र होंडा यांच्या सचिव बाना गावस व देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रशांत देसाई यांची उपस्थिती होती.

परमेश्वराची अधिष्ठान असले की सर्व साम्य होते. मराठी भाषेने संस्कृती जोपासली. मराठी भाषेमुळेच आज गोमंतकातील धार्मिक अधिष्ठानाचे रक्षण झाले हे आपण विसरता कामा नये. मराठी भाषेमध्ये भजन, कीर्तन चालतात. यामुळे यामुळे मराठी भाषेच्या गोडव्यावरच संस्कृतीचे अधिष्ठान आज भक्कमपणे उभे आहे हे प्रत्येकाला माहित आहे. गोवेकरांच्या मनातून मराठी भाषेचे अस्तित्व नष्ट करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला. मात्र मराठी भाषा ही प्रत्येक गोमंतकियांच्या हृदयामध्ये सुगंध निर्माण करीत आहे, असेही भालचंद्र केळुस्कर म्हणाले.मराठी भाषेमुळे गोमंतकाला राष्ट्रीयत्वाचे महत्त्व प्राप्त झाले. मराठी भाषा हा गोमंतकाचा आत्मा आहे. हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. मराठी भाषा ही बाहेरची नसून ती परंपरानुसार अनेक वर्षापासून गोमंतकामध्ये आहे व येणाऱ्या काळातही हजारो वर्षांपर्यंत ती निश्चितच टिकणार, असे उद्गार पत्रकार परेश प्रभू यांनी काढले.

घर शाळा मंदिरांना मराठीमुळे ऊर्जा : अनिल सामंत

आज गोव्याची सांस्कृतिक परंपरा मराठी भाषेवर उभी आहे. ग्रामीण भागामध्ये देवस्थानात सुरू असलेली भजने कीर्तने व सांस्कृतिक कार्यक्रम हे मराठी भाषेतून चालतात. यामुळे घर शाळा व मंदिरांनी मराठीला ऊर्जा देण्याचे काम केले आहे. यामुळे मराठी भाषेचे वैभव कुणीही विसरून चालणार नाही. येणाऱ्या काळातही हे वैभव आणखीन वाढावे यासाठी तऊणांनी मराठी भाषेचा वापर करण्यावर भर द्यावा, असे आवाहन प्रा. अनिल सामंत यांनी केले. होंडा सरपंच शिवदास माडकर यांनी अशा उपक्रमांना नेहमीच सहकार्य मिळले असे सांगितले. डॉ.अशोक वझे, नरहरी हळदणकर, राघोबा परब, सत्यवान नाईक यांनीही विचार मांडले. सुऊवातीला आनंद मयेकर यांनी व्यासपीठावरील इतर मान्यवरांचे स्वागत केले. दरम्यान उद्घाटन समारंभावेळी माजी स्वतंत्र सैनिकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये सौ. व श्री. विठ्ठल चौगुले, सौ. व श्री. फटू गावकर, सौ. व श्री. राजाराम महाले यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन सुनिता परब यांनी केले तर शेवटी जयसिंग पाटील येणे उद्घाटन सत्राचे आभार मानले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्याच्या मराठी भाषेमध्ये योगदान या विषयावर परिसंवाद घेण्यात आला यामध्ये आनंद मयेकर शिवाजी देसाई यांनी भाग घेतला.

पालखी दिंडीचे उत्कृष्ट आयोजन

संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी होंडा नारायणनगर येथील गणेश देवस्थानात परिसरातून उत्कृष्ट पालखी दिडीचे आयोजन केले होते. यामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी व नागरिकांनी भाग घेतला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article