नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सरत्या वर्षात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे केली आहे. स्वत:ची एसआरपीडी सिस्टम तयार करून प्रश्नपत्रिका पाठवल्या, किरकोळ त्रुटी वगळता हा प्रयोग यशस्वी झाला. आता प्राथमिक स्वरूपात काही पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका ऑनस्क्रिन तपासण्याचे काम सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सर्वच अभ्यासक्रमाचे पेपर ऑनस्क्रिन तपासण्याचा मानस आहे. तसेच यंदा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा प्रकारात विद्यापीठातील खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी केली. तसेच कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी मॅटवरील कुस्ती संकुल विद्यापीठात उभारण्यात आले आहे.
विद्यापीठातील सुविधा
विद्यापीठ अंतर्गत क्रीडा पदवी अभ्यासक्रम सुरू
विद्यापीठात खेळाडूंसाठीच्या वसतिगृहाचे बांधकाम सुरू
अधिसभेत खेळाडूंच्या दैनंदिन भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय
800 अभ्यासक्रमाच्या 20 लाख उत्तरपत्रिका ऑनस्क्रिन तपासल्या जाणार
स्वत:ची एसआरपीडी तयार करून परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाठवल्या
विद्यापीठातील अनेक समाजोपयोगी संशोधनाला पेटंट
नॅकचे ‘ए प्लस प्लस’ मूल्यांकन
विद्यापीठ अंतर्गत अनेक महाविद्यालय स्वायत्त
कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून प्रोटीनयुक्त व्हे आंबिलची निर्मिती
व्यवसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढला
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची प्रगती
कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक क्षेत्रातही सरत्या वर्षात मोठी प्रगती झाली आहे. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपले स्थान मिळवले आहे. दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय झाला आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्येही नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या आंदोलनानंतर अनुदानाचा पुढचा टप्पा देण्याचा निर्णय
माझी शाळा, मुख्यमंत्री शाळा उपक्रमात कोल्हापुरातील शाळांना बक्षिस
शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांकडून पेटंटला पात्र उपकरणांची मांडणी
स्पर्धा परीक्षांमध्ये कोल्हापुरच्या विद्यार्थ्यांची बाजी
दहावी-बारावी परीक्षेत विभागात कोल्हापूर अव्वल
सर्व शाळांमध्ये अटल किंकरींग लॅबच्या माध्यमातून ऑनलाईन अध्यापन करण्याचा प्रयत्न
जिल्हा परिषद, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा टक्का वाढला
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती