दुसऱ्या टप्प्यातील निविदा तत्काळ राबवा
कोल्हापूर :
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाच्या पहिल्या टप्प्यातील कामे नियोजीत वेळेत पुर्ण करण्याच्या सुचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी ठेकेदार कंपनीस दिल्या. तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामांची निविदा प्रक्रिया गतीने राबवून या कामांनाही लवकरच प्रारंभ करण्याच्या सुचनाही यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाची शनिवारी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी पाहणी केली. यावेळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी पहिल्या टप्प्याचे काम लवकरात लवकर व नियोजित वेळेत संपवणेच्या सूचना संबंधित ठेकेदार व सल्लागार कंपनीला दिल्या. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्याच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. नवीन कलादालनाची नियोजित इमारत जागेची पहाणीही यावेळी करण्यात आली. सदरची जागा ताब्यात घेणेसाठी आवश्यकता बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, कनिष्ठ अभियंता मिलिंद पाटील, नाट्यागृह व्यवस्थापक समीर महाब्री, ट्रकवेल कंपनीचे सल्लागार आर्किटेक्ट चेतन रायकर, रंगकर्मी आनंद काळे, प्रसाद जमदग्नी उपस्थित होते.