For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लाडकी बहीण’योजनेची योग्य अंमलबजावणी करा

06:16 AM Jan 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘लाडकी बहीण’योजनेची  योग्य अंमलबजावणी करा
Advertisement

पात्र महिला वंचित राहता कामा नये : उच्च न्यायालयाचे राज्य निर्देश

Advertisement

मुंबई : (प्रतिनिधी)

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुऊ केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुऊ राहणार कि नाही, याबाबत संभ्रमावस्था असताना उच्च न्यायालयाने राज्यभरातील महिलांना मोठा दिलासा दिला. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेची सुरळीत आणि योग्यरीत्या अंमलबजावणी करा, कुठलीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घ्या. असे आदेश राज्य सरकारला दिले

Advertisement

बोरिवली येथील प्रमेय वेल्फेअर फाऊंडेशनच्यावतीने अॅड. ऊमाना बगदादी यांनी लाडकी बहीण योजनेला विरोध होत आहे. 46 हजार कोटींच्या तरतुदीवर कॅगनेही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे ही योजना बंद केली जाणार का? दरमहा 1500 ऊपयांच्या लाभापासून वंचित राहणार का? अशी शंका उपस्थित करत या  योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका दाखल केली.

यावेळी राज्य सरकारने संबंधित विभागाच्या उपसचिवांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे सुऊवातीच्या अडचणी दूर करण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती न्यायालयाला दिली. विविध विभागांमधील 11 एजन्सींना महिलांचे अर्ज सादर करण्याकामी मदत करण्यासाठी नियुक्त केले होते. प्राप्त झालेल्या 2.51 कोटी अर्जांपैकी 2.43 कोटीपेक्षा जास्त अर्ज पात्र ठरवण्यात आले असून जवळपास 90 हजार अर्ज नाकारण्यात आल्याचे  सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले.

लाडकी बहीण योजनेचे ‘नारीशक्ती दूत’  हे काम करेनासे झाल्याने राज्यभरातील अनेक महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या. त्यामुळे महिलांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारावेत, अशी मागणी प्रमेय वेल्फेअर फाऊंडेशनने केली होती. त्यावर महिला व बालविकास विभागाच्या उपसचिव आनंद भोंडवे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात महिलांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास असमर्थता दर्शवत 90 हजारांवर महिलांचे अर्ज फेटाळल्याची कबुली दिली

Advertisement
Tags :

.