For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सातवा वेतन लागू करा

12:08 PM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
सातवा वेतन लागू करा
Advertisement

अरिअर्स न मिळाल्याने कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांची सीईओंकडे मागणी

Advertisement

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी सोमवारी कॅन्टोन्मेंटचे सीईओ सुदाम मंचलवार यांच्याकडे केली. नवा वेतन आयोग लागू होऊन 20 महिने उलटले तरी अद्याप याचा अरिअर्स कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा, अशी मागणी करण्यात आली. कॅन्टोन्मेंटमधील लष्कराशी संबंधित अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. परंतु कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांना अद्याप तो लागू नाही. तसेच मागील 20 महिन्याचा अरिअर्सही कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नाही. यामुळे कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. कॅन्टोन्मेंटच्या सीईओंनी याबाबत योग्य निर्णय घेऊन सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी करण्यात आली.

तांत्रिक अडचणी लवकरच दूर करू

Advertisement

यावेळी बोलताना सीईओ सुदाम मंचलवार यांनी एलईओ कार्यालयाकडे या संदर्भात विचारणा केली असून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. काही तांत्रिक अडचणी असून, त्या लवकरच दूर केल्या जातील, असेही सांगण्यात आले. यावेळी कॅन्टोन्मेंटचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.