For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सातवा वेतन आयोग लागू करा!

10:34 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
सातवा वेतन आयोग लागू करा
Advertisement

ज्येष्ठ नागरिक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

Advertisement

खानापूर : तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना बुधवारी देण्यात आले. निवेदनाचा तहसीलदारानी स्वीकार करून आपण मुख्यमंत्र्यांना पाठवतो, असे आश्वासन ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तालुक्यात सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. मात्र अद्याप सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे काही ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत तटपुंज्या पेन्शवर उपजीविका करावी लागत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे लवकरात लवकर सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी निवेदनात मागणी केली आहे. यावेळी अध्यक्ष व्ही. एम. बनोशी, सेक्रेटरी सी. एस. पवार, आबासाहेब दळवी, डी. एम. भोसले, एम. ए. बेनकट्टी, प्रकाश काद्रोळी, एम. एन. देशपांडे. एल. डी. पाटील यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.