For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हादई योजना त्वरित राबवा

10:14 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
म्हादई योजना त्वरित राबवा
Advertisement

भारतीय कृषक समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : उत्तर कर्नाटकातील नागरिकांसाठी महत्त्वाकांक्षी असणारी कळसा-भांडुरा म्हादई योजना राबविण्यात गोवा सरकारकडून आडकाठी आणली जात आहे. याचा निषेध करत भारतीय कृषक समाजातर्फे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राज्य सरकारने त्वरित योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली. उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांसाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. मात्र, गोवा राज्याकडून योजना राबविण्यात आडकाठी आणून प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.

म्हादई योजनेत राजकारण आणू नका

Advertisement

नुकतीच समन्वय पथकाने कणकुंबीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. राज्य सरकारने सदर योजना तातडीने राबवून या भागातील जनतेला पाण्याची सोय करून देण्यात यावी. यामध्ये राजकारण करण्यात येऊ नये, अशी मागणीही करण्यात आली.

Advertisement
Tags :

.