For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना राबवा

10:51 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना राबवा
Advertisement

भ्रष्टाचार निर्मूलन प्रंटचे जि. पं. ला निवेदन

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यामध्ये सध्या पाऊस सुरू असून संसर्गजन्य आजार वाढीस लागले आहेत. यामध्ये डेंग्यूचे प्रमाण अधिक असून डेंग्यू नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन भ्रष्टाचार निर्मूलन आणि मानव हक्क रक्षण संघातर्फे जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांना देण्यात आले. जिल्ह्यासह राज्यामध्ये डेंग्यू आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डेंग्यू नियंत्रणासाठी ग्रा. पं. पातळीवर अधिक उपाययोजना राबविण्याची गरज आहे.

ग्रामीण भागातील गटारी व परिसराची स्वच्छता राखणे आवश्यक असून ग्रा. पं. ना याबाबत सूचना करण्यात यावी. औषध फवारणी करून रोग नियंत्रणात आणावा यासाठी जनजागृती करण्यात यावी. ग्रामपंचायत विकास अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी वेळेत हजर राहात नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची कामे खोळंबत आहेत. याकडेही लक्ष देऊन कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.