महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डेंग्यू नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना राबवा

11:54 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खासदार जगदीश शेट्टर यांची जिल्हा रुग्णालयाला भेट : गावपातळीवर जागृती मोहीम राबविण्याची सूचना

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार जगदीश शेट्टर यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णांशी चर्चा करून उपचारासंदर्भातील माहिती घेतली. तसेच बिम्स अधिकाऱ्यांना व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने उपाययोजना राबविण्याची सूचना केली. पावसाला सुरुवात झाल्यापासून डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार जगदीश शेट्टर यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरम्यान शहर परिसरात व ग्रामीण भागात डेंग्यू रोखण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. जिल्ह्यातील डेंग्यू रुग्णांची संख्या जाणून घेऊन त्यांच्या उपचारासाठी घेतल्या जाणाऱ्या खबरदारीची विचारपूस आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली.

Advertisement

डेंग्यू आजार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवाहन करण्यात यावे. गावपातळीवर जागृती मोहीम राबविण्यात यावी, अशी सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना केली. ग्रा. पं. पातळीवर डास निर्मूलनासाठी फॉगिंग करून गटारी व परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून जागृती करण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. दरम्यान खासदार जगदीश शेट्टर यांनी रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी केली. डेंग्यू रुग्णांशी चर्चा करून दिल्या जाणाऱ्या सुविधा, उपचार याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी माजी आमदार संजय पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी महेश कोणी, डॉ. विठ्ठल शिंदे, बिम्स संचालक डॉ. अशोक शेट्टी यांच्यासह इतर आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

प्रशासकीय व्यवस्था कोलमडल्यानेच मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

पावसामुळे डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 189 रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून 177 रुग्णांची नोंद असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्ण संख्या वाढत असून त्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यात याव्यात व डेंग्यू रोगावर नियंत्रण मिळविण्यात यावे, अशी सूचना वैद्याधिकाऱ्यांना केली असल्याचे खासदार शेट्टर यांनी सांगितले. महाराष्ट्र व गोवा येथून रुग्ण आल्याने आकडेवारीमध्ये तफावत झाली आहे. रोग नियंत्रणाची जबाबदारी पूर्णपणे सरकारची नसून स्थानिक स्वराज्य संस्था व नागरिकांनीही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. राज्यामध्ये प्रशासकीय व्यवस्था कोलमडली असून यासाठीच मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, जि. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article