For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंबाबाई मंदिरात भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करावी

12:06 PM Mar 31, 2025 IST | Pooja Marathe
अंबाबाई मंदिरात भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करावी
Advertisement

महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी: अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडेना दिले निवेदन, वरिष्ठांची चर्चा करून पुढील कार्यवाही-दिंडे

Advertisement

कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने वस्त्रसंहिता जारी करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने रविवारी अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांना देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत समितीच्या वरिष्ठांशी चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे दिंडे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. वस्रसंहिता संदर्भातील फलक महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून दिले जातील, असे महासंघाकडून दिंडे यांना सांगण्यात आले.

Advertisement

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने २०२० साली राज्यातील शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. शिवाय देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मश्जिद आणि अन्य प्रार्थनास्थळे, शाळा-महाविद्यालये, खासगी आस्थापने, न्यायालये, पोलीस खाते, राज्य परिवहन मंडळ (एस.टी.) आदी ठिकाणीही वस्रसंहिता लागू आहे. या वस्त्रसंहितेमुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना जीन्स पँट, टी-शर्ट, भडक रंगांचे किंवा नक्षीकाम असलेले कपडे आणि पायात स्लीपर घालण्यास आपोआप बंदी झाली आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील श्री घृष्णेश्वर मंदिर, वाराणसीचे श्री काशी विश्वेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशचे तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे श्रीपद्मनाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्रीमाता मंदिर अशा प्रसिद्ध मंदिरांमध्ये तर अनेक वर्षांपासून भाविकांसाठी वस्रसंहिता लागू झाली आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी १ जानेवारी २०१६ पासून राज्यात वस्रसंहिता लागू केली.

मंदिरात व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, धर्माचरणाला महत्त्व आहे, असल्याचे न्यायालयानेच सांगितले आहेत. तसेच भारतीय वस्त्र पाश्चात्त्यांच्या तुलनेत सभ्यतापूर्णक आहेत. ती घातल्याने संस्कृतीचा प्रचार-प्रचार आपोआप होतो. महाराष्ट्रातील देवदेवतांच्या मंदिरांचे पावित्र्य टिकवण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ गेली दोन वर्षे मंदिर विश्वस्तांचे प्रबोधन करत आहे. आजवर महाराष्ट्रातील ५५० हून अधिक मंदिरांमध्ये वस्रसंहिता लागू झाली आहे. नुकतीच मुंबई येथील सिद्धीविनायक मंदिर व जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिरात लागू वस्त्र संहिता लागू केली आहे. याचा सारासार विचार करून अंबाबाई मंदिरात वस्रसंहिता लागू करावी, एवढीच अपेक्षा आहे, असेही निवेदनात नमुद केले आहे.

निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संयोजक प्रमोद सावंत, सहसंजोयक अभिजित पाटील, समन्वयक प्रसाद कुलकर्णी, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक अभिजीत निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे योगेश केरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे संस्थापक शरद माळी, शिवसेनेचे (ठाकरे गट) करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, हिंदू जनजागृतीचे शिवानंद स्वामी, महेंद्र अहिरे आदींचा समावेश होता.

Advertisement
Tags :

.