कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

'ओहोटी' वेळी किल्ले सिंधुदुर्ग होडीसेवेवर परिणाम

11:12 AM Dec 06, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

बंदरजेटी, किल्ले सिंधुदुर्ग येथील गाळ उपसाची मागणी: ओहोटीवेळी किल्ले होडीसेवा ठेवावी लागतेय बंद: पर्यटनाला बसतोय फटका

Advertisement

मनोज चव्हाण । मालवण

Advertisement

मालवण बंदरजेटी येथे किल्ले होडी सेवेसाठी असलेल्या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहिल्याने ओहोटीवेळी होडी सेवा बंद ठेवावी लागत आहे. पर्यटकांना बंदरजेटीवरून होडीमध्ये चढण्यासाठी आणि होडी पाण्यात राहण्यासाठी आवश्यक असलेली पाण्याची खोली गाळामुळे मिळत नसल्याने अनेक तास होडी सेवा बंद ठेवण्याची वेळ होडी सेवा संघटनेवर आली आहे. बंदरजेटी आणि किल्ले सिंधुदुर्ग येथील जेटी येथेही अशीच स्थिती निर्माण झाल्याने बंदर विभागाने तातडीने यावर कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.दरम्यान, किल्ले होडी सेवा संघटनेतर्फे बंदर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन निवेदनही देण्यात आले आहे. मात्र, नगरपालिका निवडणूक आचारसंहिता असल्याने याबाबत कार्यवाही करण्यात आली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याचा थेट फटका पर्यटकांना बसत असून अनेक तास पर्यटकांना थांबून राहवे लागत आहे. यामुळे दोन्ही जेर्टीकडील मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्याची मागणी होत आहे.

गाळामुळे होडी सेवेवर परिणाम

मालवण बंदरजेटी येथे दोन-दोन जेटी किल्ला होडी सेवेसाठी अस्तित्वात आहेत. मात्र, दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. अनेक वर्षे हा गाळ न काढल्याने आणि बंदरजेटी येथे केलेल्गा कॉंक्रिटीकरण कामातील रफ मटेरियल मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावरच ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात हे सर्व साहित्य जेटीच्याच परिसरात अडकून राहिले आहे. यामुळे येथे वाळू असती, तर ती समुद्राच्या पाण्याने बाहेर आली असती. मात्र, कॉक्रिटीकरणातील साहित्य असल्याने ते त्याचठिकाणी अडकून पडले आहे. यामुळे जेटीला होड्या ओहोटीवेळी लागणे कठीण बनले आहे.किल्ले सिंधुदुर्ग येथील जेटीही नादुरुस्त सिंधुदुर्ग किल्ल्याकडील जेटी खालून पोकळ होऊन धोकादायक बनली आहे. जेटीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने अमावास्गा, पौर्णिमेच्या उधाणाच्या ओहोटीवेळी किल्ले पर्यटक होडी वाहतूक सेवा बंद ठेवावी लागत आहे. मालवण धक्का येथील नवीन जेटीकडे मोठ्या प्रमाणात गाळ पडलेला आहे. बंदर विभागाला लेखी तक्रार देऊनही काहीच कार्यवाही होत नाही, अशी खंत स्थानिक व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच प्रवासी व शाळांच्या सहलीना परतून जावे लागते. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

बंदर विकासमंत्र्यांनी लक्ष द्यावे!

मालवणच्या पर्यटनात किल्ले होडी सेवा महत्वाचा घटक आहे. पारंपरिक पद्धतीने होडीच्या सहाय्याने पर्यटकांना समुद्रातून किल्ले सिंधुदुर्ग गेथे ने-आण केली जात आहे. यासाठी चंदर विभागाने बंदरजेटी येथे नव्याने जेटी उभारून टर्मिनल केले आहे. तसेच जुन्या जेटीचीही काही दुरुस्ती केली आहे. मात्र, जेटी परिसरात असलेल्या गाळामुळे होडी सेवेवर परिणाम होत आहे. यामुळे याकडे बंदर विकासमंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.डिसेंबर महिना हा मुख्यतः सहलींचा आणि पर्यटनाचा आहे. या महिन्यात देशभरातून हजारो पर्यटक मालवणात येऊन किल्ले सिंधुदुर्गला मेट देत असतात. त्यामुळे या दोन्ही जेटींकडून गाळ उपसा होणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update# konkan update# malvan # sindhudurg fort #
Next Article