For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रायल-इराण युद्धाचा जागतिक बाजारांवर प्रभाव

06:51 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
इस्रायल इराण युद्धाचा  जागतिक बाजारांवर प्रभाव
Advertisement

दक्षिण कोरिया, जपानचा निक्केईची 3 टक्क्यांची घसरण

Advertisement

मुंबई :

भारतीय शेअर बाजार होळीनिमित्त 3 मार्च रोजी अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान आशियाई शेअर बाजारात संमिश्र व्यवहार दिसून येत आहेत. भारतीय शेअर बाजार आज होळीनिमित्त बंद आहेत.

Advertisement

कच्च्या तेलाची वाढली

आज ब्रेंट क्रूडची किंमत 3 टक्केपेक्षा जास्त वाढून प्रति बॅरल 80 डॉलरच्या वर गेली. सोमवारी ती 10 टक्क्यांनी वाढली. म्हणजेच दोन दिवसांत 13 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली. तज्ञांचा असा विश्वास आहे की जर हा ताण वाढला तर तेलाची किंमत प्रति बॅरल 120 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. त्याचा परिणाम भारतात पेट्रोल-डिझेलवर दिसून येतो.

जागतिक बाजारांमधील पडझड

?दक्षिण कोरियाचा कोस्पी 7.24 टक्केवरुन घसरून 5,791 वर बंद झाला.

?जपानचा निक्केई निर्देशांक 3.06 टक्के घसरून 56,279 वर बंद झाला.

?चीनचा शांघाय कंपोझिट 1.43 टक्के घसरून 4,122 वर बंद

?हाँगकाँगचा हँगसेंग 1.12 टक्क्यांनी घसरून 25,768 वर बंद

?पाकिस्तानचा केएसई 30 निर्देशांक 4.27 टक्क्यांनी वाढून 48,302 वर बंद

?2 मार्च रोजी अमेरिकन बाजार स्थिर राहिला

?कंपोझिट 0.36 टक्क्यांनी वाढून 22.74 वर बंद झाला.

?डाऊ जोन्स 73 अंकांनी (0.15टक्के) घसरून 48,904 वर बंद झाला.

?एस अँड पी 500 निर्देशांक 2 अंकांनी (0.04टक्के) वाढून 6,881 वर बंद

Advertisement
Tags :

.