For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युद्ध-चिप संकटाचा पुरवठा साखळीवर परिणाम?

07:00 AM Jun 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
युद्ध चिप संकटाचा पुरवठा साखळीवर परिणाम
Advertisement

मेमरी चिप्सचा तुटवडा, वाढत्या किमतीसह पुरवठा साखळीतील आव्हानांचा दूरसंचार कंपन्यांवर प्रभाव

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

मेमरी चिप्सचा तुटवडा, वाढत्या किमती आणि जागतिक पुरवठा साखळीतील आव्हानांमुळे एरिक्सनने नियोजन कालावधी 18 महिन्यांवरून 3-5 वर्षांपर्यंत वाढवला आहे. नियोजन कालावधी तीन वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढला आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत हा कालावधी 18 ते 36 महिन्यांचा होता. घटकांच्या, विशेषत: मेमरी चिप्सच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ, मागणीच्या तुलनेत मर्यादित उत्पादन, तसेच पश्चिम आशियातील युद्धामुळे पुरवठा साखळीत निर्माण झालेला व्यत्यय, ही यामागील कारणे असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

एरिक्सन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन बन्सल यांनी ही माहिती दिली. दूरसंचार सेवा पुरवठादारांना दूरसंचार उपकरणे पुरवण्यासाठी उत्पादनाचे वेळापत्रक पाळण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ते म्हणाले, ‘आपल्याला दीर्घकाळासाठी भविष्याचा अंदाज घ्यावा लागेल आणि योग्य वेळी मागणीची तयारी करावी लागेल, जेणेकरून आपण अधिक चांगले अंदाज बांधू शकू आणि कोणताही व्यत्यय टाळण्यासाठी अधिक चांगले नियोजन करू शकू. आता आम्ही तीन ते पाच वर्षांच्या कालावधीवर लक्ष केंद्रित करत आहोत.‘ पूर्वी आम्ही आमच्या ग्राहकांना वेळेवर डिलिव्हरी सुनिश्चित करण्यासाठी 18 ते 36 महिने, किमान दीड वर्षाच्या कालावधीवर लक्ष केंद्रित करत असू.“ बन्सल हे नेटवर्क हेड (दक्षिण पूर्व आशिया, ओशनिया आणि भारत) देखील आहेत.

एरिक्सन ही भारतातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक असून, तिने 1994 साली दूरसंचार उपकरण निर्मितीचा पाया घातला. ही स्वीडिश दूरसंचार उपकरण निर्माता कंपनी, जागतिक निर्माता जाबिल इंक.च्या पुणे-स्थित युनिटसोबत भागीदारी करून 5जी रेडिओ, रेडिओ ऍक्सेस नेटवर्क संगणक, प्रगत पॅसिव्ह अँटेना आणि मायक्रोवेव्ह उत्पादने तयार करते. कंपनीचे चीन, मेक्सिको आणि रोमानियामध्येही उत्पादन प्रकल्प आहेत. गेल्या वर्षी कंपनीने भारतीय कंपनी व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीजसोबत भागीदारी करून भारतातील पॅसिव्ह अँटेना उत्पादनाचा विस्तार केला. ती निर्यात बाजारपेठांनाही पुरवठा करेल.

Advertisement
Tags :

.