तापमानवाढीचा परिणाम पक्ष्यांच्या प्रजननावर
कोल्हापूर / इंद्रजित गडकरी :
गेल्या काही वर्षापासून कोल्हापुरातील तापमानात वाढ होत आहे. वाढलेल्या तापमानाचा जसा मनुष्य जीवनावर परिणाम होत आहे. तसाच परिणाम पक्षी, प्राणी यांच्यावर होताना दिसून येत आहे. विशेष करून पक्षांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे समोर आले आहे. बहुतेक पक्ष्यांमध्ये प्रजननाचा काळ हा उन्हाळ्यातच असतो. कोल्हापुरमध्ये वाढलेल्या तापमानामुळे त्यांची अंडी, नवजात पिल्ले यांच्यावर गंभीर परिणाम होतो आहे. पक्ष्यांमध्ये अंडी उबवण्यासाठी साधारणता 37 अंश तापमान लागते. परंतू कोल्हापुरातील सध्या तापमानात होत असलेल्या वाढीमुळे त्यांच्या अंड्यातील भ्रुण विकसित होण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे पक्षी अभ्यासकांचे मत आहे. परिणामी त्यांच्या नवीन प्रजाती निर्माण होण्यात घट होत आहे.
कोल्हापुर जिल्हा हा जैवविवधतेने नटलेला जिल्हा आहे. शहर व परिसरात अनेक जंगले तलावांच अस्तित्व आहे. शहराला तलावांच शहर म्हणून ओळखले जाते. या तलावामुळे देश भरातील पक्षी या तलांवाच्या परिसरात वास्तव्यास येत असतात. उत्तर भारतातील थंडी खूप असते त्याचा बचाव करण्यासाठी हे पक्षी महाराष्ट्राच्या दक्षिण भागात येत असतात. कोल्हापूर हे त्यांच्या अधिवासाठी एक महत्वाचे ठिकाण आहे. येथे त्यांना पोषक वातावरण असते. यामुळेच रंकाळा तलाव, कळंबा तलाव, पंचगंगा नदी, आणि इतर लहान जलाशयांमुळे भरपूर पाणथळ क्षेत्र आहे. कोल्हापूर आणि परिसरामध्ये उन्हाचा पारा फेब्रुवारीपासुन तापलेला आहे. मार्चच्या सुऊवातीला आलेल्या उष्णतेच्या लाटांनमुळे मानवाप्रमाणे सर्वच सजीवांना याचा त्रास होत आहे. कोल्हापुरातील तापमान 39 ते 41 अंशापर्यंत पोहचले आहे. पक्ष्यांच्या अंड्यांचे लिंग तापमानावर अवलंबुन असते. उष्णतेमुळे जास्त नर किंवा जास्त मादी जन्माला येतात, यामुळे पुढच्या पिढीचे प्रजनन अडचणीत येते. वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे.
स्थलांतरीत पक्षांना अन्न मोठया प्रमाणात मिळते. कोल्हापुरचे हवामान थंडसर आणि दमट असल्यामुळे उत्तरेकडील पक्षी थंडीपासून बचाव करण्यासाठी हिवाळ्यात इथे येतात. तसेच भारतातील पक्ष्यांच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर मार्गावर कोल्हापुर येते. म्हणुन हे पक्षी थांबा घेण्यासाठी कोल्हापुरमध्ये वास्तव करतात. परंतू गेल्या काही वर्षापासून वारंवार कोल्हापुरातील तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे पक्षांच्या अंडी उबवण्याच्या क्षमतेवर घातक परिणाम होत आहे. साधरण अंडी उबवण्याची क्षमता 37 अंश तापमानाला होत असते. पण गेली कोल्हापुरातील तापमान सध्या 39 ते 41 अंशावर पोहचले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या प्रजनन दरावर होत आहे. तसेच पक्षांना उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पक्ष्यांना ऊर्जा प्रामुख्याने उडणे, अन्न शोधणे आणि अंगसफाईसाठी लागते त्यांचे बेसल मेटाबॉलिक रेट जास्त असते. त्यांचे तापमान 35 ते 37 अंश दरम्यान असते. त्यांचे शरीर लहान असल्यामुळे उष्णतेचे संतुलन राखण्यासाठी त्यांना अधिक ऊर्जेची गरज असते. जर वातावरणातील तापमान त्यांच्या शरीराच्या तापमानापेक्षा जास्त झाले, तर ते निर्जलीकरणाचे बळी ठरतात. त्यांच्यामध्ये अशक्तपणा, सतत चोच उघडुन श्वास घेण, हालचाल कमी होणे, डोळे खोल जाणे, त्वचेमध्ये लवचिकता कमी होणे, चोचेजवळ चिकट म्युकस जमा होणे, अशा प्रकारची लक्षणे त्यांच्यामध्ये दिसु लागतात.
- निर्जलीकरणाचे परिणाम
उष्णतेच्या वातातरणात निर्जलीकरण ही सर्व सजीवांवर होणारी सामन्य आणि थेट प्रतिक्रीया आहे. परंतु त्यासोबत याचे अनेक अप्रत्यक्ष परिणामही होतात जसे की अन्नपोषणाच्या गुणवत्तेत घट होणे, नैसर्गीक अधिवासांची हानी होणे, पाणी व अन्न घेण्याच्या सवयींमध्ये बदल होणे, मिलन व प्रजनन प्रक्रियांमध्ये अडथळे निर्माण होणे.
- उत्तरेकडील पक्ष्यांच्या स्थलांतरात होतेय घट
कोल्हापुरमध्ये भारताच्या उत्तर भागातुन अनेक पक्षी वास्तवात येत असतात. उत्तरेकडील भागामध्ये थंडी खुप असते या थंडीपासुन बचाब करण्यासाठी पक्षी कोल्हापुरातील रंकाळा तलाव, कळंबा तलाव इथे वास्तव करण्यासाठी येत असतात ते साधारण मे ते जुन पर्यत इथे वास्तव करत असतात पण शहरातील तापमानाची वाढत चालेली पातळी बघता यावर्षी पक्षांच्या स्थलांतरात घट होत आहे.
प्राध्यापक, डॉ. सुनिल गायकवाड, पक्षी अभ्यासक शिवाजी विद्यापीठ
- शिवाजी विद्यापीठाकडुन होतेय देशी वृक्षांची लागवड
जीवशास्त्र विभागातील तज्ञांच्या माहितीनुसार पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेस प्रोत्साहन देण्यासाठी देशी वृक्षांच्या लागवडीवर भर देण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आंबा, जांभुळ, वड, पिंपळ, लिंब, करंज, हिरडा, बेरडा, चिंच, कडुलिंब, बाभुळ, पळस, भोकर, आवळा, साग, ऐन, अर्जुन, इत्यादी देशी प्रजातींचा समावेश आहे. विद्यापीठाच्या 850 एकर परिसरात पक्ष्यांच्या साधारण 90 प्रजाती आढळतात.
- कोल्हापुरात येणारे स्थलांतरीत पक्षी
कॉमन ग्रीनशॅक, ग्रीन सॅडपायपर, वूड सँडपायपर, कॉमन सँडपायपर, टेमींक्स स्टिंट ब्राउढन श्राइक, एशी ड्रोंगो, रोजी स्टारलिंग, रेड ब्रेस्टेड, साईक्स वॉब्लर, बुटेड वॉब्लर, यल्लोव वॅगटेल, इत्यादी तसेच कोल्हापुर मध्ये काही संकटग्रस्त प्रजातींचेही वास्तव्य आहे त्यामध्ये इंडियन रिव्हर टर्न, वुली नेक स्टोर्क, पैंटेड स्टोर्क. बर्डस कोल्हापुर या संस्थेने केलेल्या पक्षी गणनेत कोल्हापुरमध्ये 105 प्रजाती 1161 पक्ष्यांचा वावर असल्याची नोंद झाली आहे. यात 19 स्थलांतरीत आणि 86 स्थानिक प्रजातींची नोंद झाली आहे.
- तापमानवाढीपासून पक्षांना वाचवण्यासाठी काय केले पाहिजे
वनसंवर्धन आणि अधिवास संरक्षण वाढवणे यामध्ये झाडे लावणे जुनी झाडे न तोडणे. उन्हाळ्यात घराजवळ किंवा सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे भांडे, धान्य, फळे ठेवावीत. तसेच झाडांची संख्या कमी झाल्यामुळे पक्ष्यांना घरटे बांधायला जागा मिळत नाही आपण लाकडी किंवा मातीचे घरटे घराजवळ झाडांवर लावु शकतो.