भूजलाच्या अत्याधिक वापरामुळे पृथ्वीवर परिणाम
31.5 इंचानी झुकली पृथ्वी
पृथ्वी सूर्याभवती फिरत असते, ज्यामुळे दिवस अन् रात्र होत असते. परंतु ज्या पृथ्वीला आपण अत्यंत स्थिर आणि मजबूत मानतो, ती मानवी हालचालींमुळे अंतराळात स्वत:च्या स्थानावरून डगमगली आहे. माणसांकडून बेहिशी भूजलाचा वापर झाल्याने पृथ्वीचा रोटेशनल एक्सिस जवळपास 31.5 इंचाने सरकला आहे. हा बदल 1993 ते 2010 दरम्यान घडला आहे.
ब्रह्मांडाच्या निकषावर एका पूर्ण सौर प्रणालीचा ग्रह अशाप्रकारे डगमगणे वैज्ञानिकांसाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. यासंबंधीचा खळबळजनक खुलासा सियोल नॅशनल युनिव्हर्सिटीचे जियोफिजिसिस्ट की-वियोन सेओ आणि त्यांच्या टीमने केला आहे. हे संशोधन जियोफिजिकल रिसर्च लेटर्समध्ये प्रकाशित झाले आहे.
2026 मध्ये समोर आलेली अन्य संशोधनं म्हणजेच जर्नल ऑफ जियोडेसी आणि नेचरच्या अहवालांनी देखील पाण्याच्या मोठ्या प्रमाणावरील वापरामुळे पृथ्वीची स्थिती बदलत असल्याची पुष्टी केली आहे. तर समुद्राची पातळी वाढवून किनारी भागांना बुडविण्याचे कामही करत आहे.
पृथ्वीचे संतुलन कसे बदलले?
पृथ्वीचे फिरणे आणि ती झुकण्यामागे पूर्णपणे भौतिकशास्त्राचा एक साधा नियम काम करतो. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट मग ते महासागर असो, उंच पर्वत असो, ग्लेशियर असो किंवा जमिनीखालील अब्जाधी टन पाणी सर्वांचे स्वत:चे एक वजन असते. जोपर्यंत हे वजन स्वत:च्या ठिकाणी कायम राहते, पृथ्वी एक निश्चित वेग आणि कोनावर फिरत राहेत. परंतु माणूस एका ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात वजन हटवून त्याला दुसऱ्या ठिकाणी पोहोचवितो, तेव्हा पृथ्वीचे मास डिस्ट्रिब्युशन बिघडून जाते. पाण्यात अत्यंत वजन असते आणि हेच वजन सरकल्यामुळे निर्माण झालेल्या लीवरेजने पृथ्वीच्या फिरण्याच्या ध्रूवाला स्वत:च्या ठिकाणावरून हटण्यास भाग पाडल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
2015 गीगाटन पाणी
वैज्ञानिकांनी कॉम्प्युटर मॉडेल्स आणि सॅटेलाइट डाटाच्या मदतीने माणसाने 1993-2010 दरम्यान भूजल साठ्यांमधून जवळपास 2150 गीगाटन (म्हणजेच 21 लाख 50 हजार कोटी टन) पाणी पंप करून बाहेर काढल्याचा अनुमान लावला आहे. इतक्या भरभक्कम पाण्याचा वापर मुख्यकरून पिकांचे सिंचन करणे आणि शहरांची तहान भागविण्यासाठी करण्यात आला. शहरांमध्ये वापरण्यात आलेले पाणी अखेरीस नाले अन् नद्यांद्वारे विशाल महासागरांमध्ये पोहोचले. म्हणजेच जे पाणी जमिनीखाली स्थिर जमा होते, ते आता पृथ्वीवर फैलावून समुद्रांचा हिस्सा ठरले. वजनाच्या या इतक्या मोठ्या फेरफाराचा प्रभाव पृथ्वीवर पडला आहे.
संशोधकांनी जेव्हा स्वत:च्या पोलर-मोशन मॉडेलमध्ये या भूजलाच्या आकडेवारीला जोडले, तेव्हा हे वास्तविक स्वरुपात पाहण्यात येणाऱ्या पृथ्वीच्या झुकलेल्या स्थितीशी जुळणारे ठरले. जमिनीतून बाहेर काढण्यात आलेल्या या पाण्यामुळे जगभरातील समुद्रांची जलपताळी जवळपास 6.24 मिलिमीटरने वाढली आहे.
कुठल्या क्षेत्रांवर सर्वाधिक प्रभाव
पृथ्वीच्या ध्रूवांमध्ये होणाऱ्या बदलांची जितकी हवामानसंबंधी किंवा नैसर्गिक कारणं आहेत, त्यात भूजलाच्या या मोठ्या प्रमाणावरील पूनर्वितरणाचा प्रभाव सर्वाधिक दिसून आला आहे. अखेर पृथ्वीच्या कुठल्या हिस्स्यातून पाणी बाहेर काढल्यावर या फिरण्याच्या वेगावर सर्वाधिक प्रभाव पडतो हे जाणून घेण्याचा वैज्ञानिकांनी प्रयत्न केला असता चकित करणारे भौगोलिक तथ्य समोर आले. पृथ्वीच्या मध्य हिस्स्यात म्हणजेच इक्वेटर लाइनवरून पाण्याला स्थानांतरित करण्याचा प्रभाव ध्रूवांच्या वेगावर सर्वात गंभीर असतो. पश्चिम-उत्तर अमेरिका आणि उत्तर-पश्चिम भारतात मोठ्या प्रमाणात सिंचन अन् शेतीसाठी भूजल वापर हे पृथ्वीवरील प्रभावासाठी सर्वात मुख्य स्वरुपात जबाबदार आढळून आले आहे.
मानवी जीवनावरील गंभीर प्रभाव
पृथ्वीचा अक्ष डगमगणे अंतराळ विज्ञानाचा विषय असला तरीही भूजल गायब झाल्याचे परिणाम अत्यंत भयावह आहेत. अत्याधिक भूजल दोहनामुळे जगातील अनेक हिस्स्यांमध्ये जमीन खचू लागली आहे, ज्यामुळे शहरांच्या इमारती संकटात सापडल्या आहेत. 40 प्रमुख नदी खोऱ्यांमध्ये करण्यात आलेल्या अध्ययनात जमीन खचणे आता सागराच्या पातळीत होणाऱ्या वाढीपेक्षाही अधिक मोठा धोका ठरले आहे. किनारी भागांमध्ये विहिरी अन् एक्विफसंमध्ये पाण्याची पातळी घटल्याने समुद्राचे खारे पाणी वेगाने गोड्या पाण्याच्या स्रोतांमध्ये शिरत आहे.