हवामान बदलाचा परिणाम हिमालयीन क्षेत्रावर
हवामान बदलाचा सर्वात गंभीर परिणाम आता हिमालयीन क्षेत्रांमध्ये स्पष्टपणे दिसू लागला आहे. जम्मू-काश्मीरच्या पर्वतीय भागांचे तापमान मागील दोन दशकांमध्ये सुमारे एक अंशाने वाढले आहे. जर असेच जारी राहिले तर हिमालयातील ग्लेशियर वेगाने आंकुचित पावतील, ज्यामुळे भविष्यात पूर, भूस्खलन आणि जलसंकट यासारख्या समस्या आणखी गंभीर होऊ शकतात असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
आयआयटी खडगपूरच्या सेंटर फॉर ओशियन, रिव्हर, अॅटमॉस्फियर अँड लँड सायसेंसच्या (कोरल) वैज्ञानिकांनी जम्मू-काश्मीरच्या हिमालयीन क्षेत्रावर विस्तृत अध्ययन केले आहे. हे संशोधन प्रतिष्ठित जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झाले आहे. अध्ययनादरम्यान 1980-2024 पर्यंतच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले, ज्यात पर्वतीय क्षेत्रांमध्ये वेगाने वाढत्या उष्णतेचा स्पष्ट संकेत मिळाला आहे.
अध्ययनातून कोणता खुलासा?
उंचीवरील क्षेत्र अपेक्षाकृत सखल भागांच्या तुलनेत अधिक वेगाने उष्ण होत असल्याचे अध्ययनातून समोर आले. मध्य उंचीयुक्त पर्वतीय क्षेत्रांमध्ये तापमान 0.3 अंश सेल्सिअस प्रतिदशकाच्या दराने वाढतेय, तर जम्मूसारख्या मैदानी क्षेत्रांमध्ये ही वृद्धी जवळपास 0.1 अंश सेल्सिअस प्रतिदशक नोंदविली गेली आहे.
जलसंपदा अन् कोट्यावधी लोकांवर प्रभाव
हिमालयाला आशियाचा वॉटर टॉवर म्हटले जाते, कारण येथून उगम पावणारी गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा यासारख्या नद्या कोट्यावधी लोकांच्या पेयजल, सिंचन आणि ऊर्जा आवश्यकतांना पूर्ण करतात. जर ग्लेशियर्स वितळण्याचा वर्तमान वेग जारी राहिला तर प्रारंभिक वर्षांमध्ये अचानक पूर आणि भूस्खलन यासारख्या घटना वाढतील, तर दीर्घ काळात जलप्रवाहात घट झाल्यामुळे गंभीर जलसंकट निर्माण होऊ शकते. याचा थेट प्रभाव कृषी, पेयजल पुरवठा आणि जलविद्युत उत्पादनावर पडणार असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
प्रभावी देखरेख
हिमालय जगातील सर्वात संवेदनशील पर्वतीय क्षेत्रांमध्ये सामील असून येथे हवामान बदलाचा प्रभाव सर्व उंचींवर समान नाही. याचमुळे पर्वतीय क्षेत्रांमध्ये हवामानाची सखोल देखरेख, अधिक अचूक हवामान मॉडेल विकसित करणे आणि स्थानिक परिस्थितींच्या अनुरुप अनुकूलन रणनीति लागू करण्याची आवश्यकता असल्याचे संशोधकांचे मानणे आहे. वेळीच प्रभावी पावले न उचलण्यात आल्यास हिमालयात वाढत्या उष्णतेचा प्रभाव आगामी वर्षांमध्ये जलसंपदा, पर्यावरण आणि कोट्यावधी लोकांच्या उपजीविकेवर पडू शकतो असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.