For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्फोटकांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक

08:19 AM Aug 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्फोटकांची बेकायदा वाहतूक  करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक
Advertisement

जिलेटीन कांड्या, डेटोनेटर्स, वायर बंडल जप्त : मुडलगी पोलिसांची कारवाई

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

बेकायदा स्फोटके बाळगणाऱ्या मुडलगी येथील एका तरुणाला अटक करून त्याच्याजवळून जिलेटीनच्या कांड्या, डेटोनेटर्स जप्त करण्यात आले आहेत. मुडलगी पोलिसांनी ही कारवाई केली असून जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

Advertisement

युधिस्तरसिंग कर्णिमसिंग चुडावत (वय 21) राहणार अमननगर, मुडलगी असे त्याचे नाव आहे. रायबाग येथील रोशन जाट व प्रकाश चाट या दोघा जणांनी दिलेली स्फोटके केए 49 जे 5977 क्रमांकावर मोटरसायकलवरून नेताना युधिस्तरसिंगला पोलिसांनी अटक केली आहे.

निपाणी-मुधोळ रोडवरील हळ्ळूरजवळ स्फोटकांची वाहतूक करताना युधिस्तरसिंगला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता हा साठा आपण रायबाग येथील दोघा जणांकडून आणल्याची कबुली दिली. त्याच्याजवळून 750 मीटरचे दोन एक्स्प्लोजिव्ह वायर बंडल, 200 जिलेटीनच्या कांड्या, 100 नॉनइलेक्ट्रिक डेटोनेटर्स व हिरोहोंडा स्प्लेंडर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली मुडलगीचे पोलीस उपनिरीक्षक वाय. एस. बिसनाळ, जगदीश मिरजी, एस. जी. मण्णापूर, के. सी. बागली, एल. बी. गौडेर आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. ही स्फोटके कोठे नेली जात होती? याची चौकशी करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.