For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोंदा येथील बंद पोलीस दुरक्षेत्र तात्काळ सुरु करा

12:58 PM Jan 23, 2025 IST | अनुजा कुडतरकर
आरोंदा येथील बंद पोलीस दुरक्षेत्र तात्काळ सुरु करा
Advertisement

अन्यथा २६ जानेवारीला उपोषण छेडणार : ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीचा इशारा

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
आरोंदा ग्रामपंचायत हद्दीत असलेले आरोंदा पोलीस दुरक्षेत्र अनेक वर्षे बंदावस्थेत आहे.याबाबत ग्रामपंचायत आरोंदा व ग्रामस्थ यांच्याकडून पोलिस दुरक्षेत्र सुरु करण्यासंदर्भात व मंजूर रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहार केलेला होता.परंतु कोणत्याही प्रकारची तक्रार दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे २६ जानेवारी रोजी ग्रामस्थांसह सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.
आरोंदा पंचक्रोशीसाठी आरोंदा पोलीस दुरक्षेत्र आहे.परंतु गेली अनेक वर्षे पोलीस दुरक्षेत्र बंद आहे.आरोंदा पोलीस दुरक्षेत्र येथे चार व पोलीस चेकपोस्ट किरणपाणी येथे चार असे एकूण आठ मंजूर पदे आहेत.मात्र सद्यस्थितीत पोलीस दुरक्षेत्र व पोलीस चेकपोस्ट येथे फक्त तीन पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.