For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिव्यांगावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करा

12:11 PM Jun 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिव्यांगावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करा
Advertisement

नागरिकांची पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

Advertisement

बेळगाव : गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात सचिन रामचंद्र पाटील या दिव्यांग व्यक्तीवर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला होता. मात्र सदर प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी अद्यापही हल्लेखोरांना अटक केलेली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन पोलिसांना सूचना करावी यासाठी दिव्यांग व नागरिकांनी मंगळवारी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. सचिन रामचंद्र पाटील हे दिव्यांग असून ते आपल्या घरासमोर थांबले असता मागून आलेल्या एका हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला करून पलायन केले. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असतानाही पोलिसांनी अद्यापही आरोपींना अटक केलेली नाही. त्यामुळे याकडे पोलीस आयुक्तांनी लक्ष देऊन प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना पोलिसांना करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी गजानन साबण्णावर, परशुराम मानूरकर, महांतेश होंगल, गणेश सडेकर, सुरेश शिंदे, अनिल कालकुंद्रीकर, अशोक बांदिवडेकर, योगेश बांदिवडेकर, सोनल पाटील, लता कवडे आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.