MH Weather Update: राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पुढील चार दिवस मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला
IMD Rain Update In Maharasthra : मागील काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. राज्यात काही ठिकाणी मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यासह, मुंबई, कोकण, सातारा, घाट प्रदेश, मराठवाड्यातही पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे. सध्या उष्णता वाढली असून नागरिक उन्हामुळे हैराण झाले आहेत.
दरम्यान, आता पुणे हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. आज नाशिक, पुणे, सातारा आणि घाट विभागासह आहिल्यानगर जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना IMD कडून आज व उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील कोकण विभागात म्हणजे रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवस मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील पाच ते सात दिवस मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
तसेच वरील काही भागांत वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे. याशिवाय कोकण, मराठवाड्यात पुढील चार ते सात दिवस कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. मध्य महाराष्ट्रात मात्र 1 ते 2 अंश सेल्सिअस तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमानातून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. कोकण व लगतच्या भागात हवेची स्थिती तयार झाली आहे. राज्याच्या उर्रवरित भागात विदर्भासह काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या संपूर्ण भागात म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडासह वादळी वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या भागांतील प्रशासनालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्याता आल्या आहेत.