For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Monsoon Update | राज्यात सर्वदूर दमदार पावसाचा अंदाज पूर्वीय वाऱ्यांचा प्रभाव

10:00 PM Jul 26, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
monsoon update   राज्यात सर्वदूर दमदार पावसाचा अंदाज पूर्वीय वाऱ्यांचा प्रभाव
Advertisement

त. भा. प्रतिनिधी, पुणे
पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांत वाढ होत असून, यामुळे राज्यात पुढील काही दिवस सर्वदूर पावसाची शक्यता आहे, तर पुढील 48 तासांत पावसाची तीव्रता अधिक असेल, असे हवामान खात्याने रविवारी सांगितले.
राजस्थान व लगतच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. याशिवाय ओरिसा व पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे न्यून दाबाच्या क्षेत्रात ऊपांतर झाले असून, येत्या 24 तासांत त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे.

Advertisement

सोमवारी दुपारी हे क्षेत्र उत्तर ओरिसा ते दक्षिण पश्चिम बंगालची किनारपट्टी पार करीत जमिनीवर येणार आहे. याच्या प्रभावामुळे, ओरिसा तसेच पश्चिम बंगाल तसेच छत्तीसगड राज्यात अतीवृष्टी ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांना देखील समुद्रात न जाण्याची सूचना करण्यात आली आहे.

दरम्यान, या क्षेत्राच्या प्रभावामुळे उत्तर तसेच मध्य भारतात पावसाचा प्रभाव वाढणार आहे. गंगेच्या खोऱ्यातील राज्ये, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट पुढील दोन दिवसांसाठी देण्यात आला आहे.
राज्यात सर्वदूर पाऊस
दुसरीकडे पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात देखील पावसाचा प्रभाव वाढला आहे. शनिवारी पावसाने किंचित उसंत घेतली होती, रविवारी मात्र राज्याच्या बऱ्याचशा भागात पावसाची संततधार सुऊ होती. न्यून दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागांत ऑरेंज अलर्ट आहे. यात पुढील 48 तासांत पावसाची तीव्रता अधिक असेल.

Advertisement

सोमवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा बसणार आहे,तर रायगड, रत्नागिरी, पुणे व सातारा घाट परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा यलो अलर्ट आहे.
मंगळवारी विदर्भात गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुरात ऑरेंज अलर्ट आहे, तर कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम स्वऊपाच्या पावसाचा यलो अलर्ट आहे, बुधवारी विदर्भात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.