For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चोरटी वाहतूक करणारी गोवा बनावटीची दारू जप्त

12:05 PM Jan 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
चोरटी वाहतूक करणारी गोवा बनावटीची दारू जप्त
Advertisement

कारवार तालुक्यातील सदाशिवगड पोलिसांची कारवाई : दीड लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त

Advertisement

कारवार : स्कॉर्पियो वाहनातून गोव्याहून हुबळीकडे चोरटी वाहतूक करण्यात येत असलेली दीड लाख रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. शिवाय गोकुळनगर हुबळी येथील नारायण (वय 30) नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री सदाशिवगड चिताकुला पोलिसांनी केली. प्रकरणाबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, सदाशिवगड पोलिसांना विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवार तालुक्यातील मुंडगेरी येथून हुबळीकडे निघालेली केए 25 एन 4141 स्कॉपियो वाहन सदाशिवगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचेकाडा येथील ओल्ड आईस फॅक्टरीजवळ अडविण्यात आले.

वाहन अडवून वाहनाची कसून तपासणी केली असता 1 लाख 26 हजार 920 रुपये किंमतीची वेगवेगळ्या ब्रॅण्डची गोवा बनावटीची चोरीची दारू आढळून आली. ताब्यात घेण्यात आलेल्या नारायण नावाच्या व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारची अधिकृत कागदपत्रे नव्हती. गोवा बनावटीची दारू अधिक भावाने हुबळी येथे तो वाहतूक करीत होता, असे सांगण्यात आले. या कारवाईत सदाशिवगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक परशुराम खर्जगी, एएसआय सतीश नाईक, पोलीस कर्मचारी गौतम दोड्डण्णावर, विनय काणकोणकर, बसाप्पा कित्तूर, अभिजित आर.एल., प्रदीप आदी सहभागी झाले होते. सदाशिवगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.