For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘चोरट्या वन्यजीव शिकारीला’ आता जिल्ह्यात लगाम

12:06 PM Jun 04, 2025 IST | Radhika Patil
‘चोरट्या वन्यजीव शिकारीला’ आता जिल्ह्यात लगाम
Advertisement

कोल्हापूर / इंद्रजित गडकरी : 

Advertisement

पश्चिम घाटाच्या सान्निध्यात वसलेल्या कोल्हापूरच्या निसर्गसमृद्ध जंगलात रानडुक्कर, ससा, साळिंदर व घोरपड यांचा अधिवास आहे. मात्र या वन्यजीवांच्या जीवावर उठलेल्या शिकारींना रोखण्यासाठी वनविभागाने 2022 पासून सुरू केलेली मोहीम अधिक तीव्र झाली आहे. गेल्या अडीच वर्षांत तब्बल 63 शिकारी प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

गावठी बंदुका, काडतुसे, फासके, मोबाईल व मोटारसायकली जप्त करत संशयितांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, अनेक शिकारी आपल्या मोबाइलवर टिपलेल्या शिकारीचे फोटो व व्हिडीओ यामुळेच सापडले

Advertisement

  • 2022 पासून मे 2025 पर्यंत वनविभागाने कोल्हापूरात 63 प्रकरणांवर कारवाई 

- 2022 : रानडुक्कर आणि ससा शिकारीच्या प्रकरणांनी वनविभागाला जागे केले. यामुळे गस्त वाढवत शिकारींवर नजर ठेवण्यास सुरुवात झाली.

-मार्च 2024: 14 मार्चला पन्हाळा येथे 4 शिकारींना गावठी बंदूक,, 2 बॅटरी आणि सुरीसह पकडले.

23 मार्चला फासके, मोबाइल आणि बॅटरीसह एक संशयित गजाआड.

25 मार्चला साळिंदर शिकारीसाठी 5 जणांना अटक,

26 मार्चला एअर गन आणि मोबाइलसह 6 जण पकडले गेले

जून 2024: 10 जूनला करवीर येथे गावठी बंदूक, 6 काडतुसे आणि चाकूसह एक शिकारी पकडला.

14 जूनला मोटरसायकलसह 3 जणांना अटक.

ऑगस्ट 2024: 27 ऑगस्टला गारगोटी येथे घोरपड शिकारीसाठी 5 संशयित गजाआड, तर

-23 ऑगस्टला आजरा येथे रानडुक्कर शिकारीसाठी 2 मोबाइल आणि मोटरसायकल जप्त.

-ऑक्टोबर 2024: 25 ऑक्टोबरला मलकापूर येथे गावठी बंदूक, बॅटरी आणि 7 काडतुसे जप्त.

- 30 ऑक्टोबरला गारगोटी येथे रानडुक्कराचे मांस आणि सुरीसह एक शिकारी पकडला.

-डिसेंबर 2024 : 18 डिसेंबरला मलकापूर येथे रानडुक्कराचे मांस, तर 29 डिसेंबरला गगनबावडा येथे चकोत्री पक्षी शिकारीसाठी 2 संशयितांना मोटरसायकलसह अटक.

-फेब्रुवारी-मार्च 2025 : 10 फेब्रुवारीला आजरा येथे रानडुक्कर शिकारीचे प्रकरण, तर 7 मार्चला मलकापूर येथे गावठी बंदूक, सुरी आणि मासे मारण्याचे जाळे जप्त.

- 14 मार्चला कडगाव येथे 11 जिवंत काडतुसे आणि 3 मोबाईल हस्तगत.

- मे 2025: 17 मेला पन्हाळा येथे शिकारीचे फोटो आणि व्हिडिओ असलेले 2 मोबाईल जप्त

-29 मेला करवीर येथे घोरपड शिकारीसाठी 3 मोबाईल आणि लोखंडी पिंजरा जप्त.

  • कोल्हापूरचे जंगल आणि शिकारीचे बेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे पश्चिम घाटातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सह्याद्रीच्या जंगलांचा खजिना. येथील पाटणे, मलकापूर, गारगोटी, आजरा, राधानगरी, कडगाव, गगनबावडा, पन्हाळा आणि करवीर ही गावे शिकारींच्या रडारवर आहेत. राधानगरीत साळिंदर आणि रानडुक्कर मोठ्या संख्येने आढळतात, तर पाटण आणि मलकापूरमध्ये ससा आणि चकोत्री पक्ष्यांची शिकार वाढली आहे. शिकारी गावठी बंदुका, फासके आणि मोबाइलचा वापर करत जंगलात घुसतात, पण वनविभागाच्या ड्रोन आणि गुप्त माहितीच्या जाळ्याने त्यांचे बेत उधळले जात आहेत.

  • स्थानिकांच्या सहभागाशिवाय ही लढाई जिंकणे कठीण आहे.

आमचे जंगल आणि वन्यजीव हे कोल्हापूरचे वैभव आहे. 2022 पासून आम्ही शिकारींना पकडण्यासाठी रात्रंदिवस गस्त घालत आहोत. मोबाइलवरील फोटो- व्हिडिओ आम्हाला गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात मदत करतात.गावकऱ्यांनीही माहिती देऊन आम्हाला साथ दिली आहे. आम्ही गावोगावी जाऊन लोकांना वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व सांगत आहोत. स्थानिकांच्या सहभागाशिवाय ही लढाई जिंकणे कठीण आहे.

                                                                                                                       -जी. गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक कोल्हापूर

Advertisement
Tags :

.