For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kavathe Mahankal News | कवठेमहांकाळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पिस्तूल, काडतूस आणि दोन तलवारी जप्त

04:39 PM Jun 17, 2026 IST | NEETA POTDAR
kavathe mahankal news   कवठेमहांकाळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई  पिस्तूल  काडतूस आणि दोन तलवारी जप्त
Advertisement

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळशहरात एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस व दोन धारदार तलवारी तीन आरोपींकडून जप्त करण्यात कवठेमहांकाळ पोलिसांना यश आले आहे.

Advertisement

याबाबत माहिती अशी की, सोमबार १५ जून रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल करे, पोलिस नाईक मासाळ, पोलिस शिपाई करांडे, पोलिस शिपाई कासार असे कवठेमहांकाळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रालिंग करताना पोलिस शिपाई कासार यांना खास बातमी मिळाली की, एका पांढऱ्या रंगाच्या अल्टो कारमध्ये तीन इसम बेकायदा पिस्तूल व तलवारी विक्री करणेकरीता येणार असलेबाबत माहिती मिळाल्याने निरीक्षक प्रविणकुमार कांबळे यांचे आदेशाप्रमाणे जाधव बस्ती, देशिंग रोड, कवठे महांकाळ येथील परिसरात सापळा लावला असता मिळालेल्या बातमी प्रमाणे एक पांढऱ्या रंगाची अल्टो कार क्र. एम एच १२ एल ही ७८३३ ही समोरुन येताना दिसली त्या गाडीस थांबवून पंचांसमन झडती घेतली असता आरोपी आयान आझाद शेख रा. शिंदेमळा,लव्हली सर्कलजवळ, सांगली याचे कमरेला पाठीमागील बाजुस एक पिस्तूल व खिश्यामध्ये एक जिवंत काडतूस मिळून आला.

तसचे अल्टो गाडीची झडती घेतली असता खाकी व लाल रंगाचे कपडयामध्ये दोन तलवारी मिळुन आल्याने त्यांच्याकडे तपास केला असता आरोपी असिफ अल्ताफ जमादार रा. गल्ली नं. ९ श्रीरामनगर विजयनगर सांगली, आयान आझाद शेख रा. शिंदेमळा, लव्हली सर्कलजवळ, सांगली, शफिक लतिफ पाशा रा.कुरणे गल्ली, शिंदेमळा, सांगली यांनी मिळून तलवार व पिस्टल विक्री करण्याकरीता आणलेचे सांगितले त्यामुळे त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.