संगमेश्वर-लोवलेत गुरांची अवैध वाहतूक
संगमेश्वर :
संगमेश्वर-कोल्हापूर राज्य मार्गावरील संगमेश्वर-लोवलेदरम्यान अवैध गुरे वाहूतकप्रकरणी 5 गुरे, बोलेरो पिकअपसह 4 लाख 31 हजारांचा मुद्देमाल संगमेश्वर पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई गुऊवारी पहाटे 5.30 च्या दरम्यान केली.
संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर भागोजी वाघमोडे (27, रा. चांदोली आंबा ता. मलकापूर जि. कोल्हापूर) पांडुरंग कोंडीबा लांबोरे (32, रा. कांडवड ता. मलकापूर जि. कोल्हापूर) यांनी एकमेकांच्या संगनमताने त्यांच्या ताब्यातील बोलेरो पिकअपमधून (एमएच 08 डब्ल्यू 3491) गुरांची वाहतूक करीत होते. यामध्ये 20 हजार, 16 हजार, 18 हजार आणि 17 हजार ऊपये किंमतीचे 4 बैल आणि 10 हजार ऊपये किंमतीच्या पाड्याचा समावेश होता. एकूण 4 बैल, 1 पाडा यांना वेदना किंवा यातना होतील अशाप्रकारे आखूड दोरीने मानेला बांधून व कोंबून त्यांची वाहतूक केली जात होती. गुरे खरेदी-विक्रीची पावती तसेच गुरे वाहतूक करण्याचा परवाना त्यांच्याकडे नव्हता. भागोजी भिऊ कोलापटे (रा. लपाळा ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर) यांच्या सांगण्यावरून सावर्डे येथील मधुकर तुकाराम सावर्डेकर (60, रा. कळवंडे ता. चिपळूण) यांच्याकडून ही गुरे बेकायदेशीररित्या नेली जात होती. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5,5 (अ), 5 (ब),9, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (घ) (ड) (च), महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 119, सह मो. वा. का. क. 66/192, 3/181 सह, प्राण्यांची वाहतूक नियम 1978 चे कलम 47, 48, 49, 50, 51, 54,56 भा. न्याय. सं. 2023 चे कलम 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक शिवकुमार पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सचिन कामेरकर, उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, मनवळ किशोर जोयशी, कोलगे यांनी ही कारवाई केली. संगमेश्वर पोलिसांनी लागोपाठ केलेल्या कारवाईमुळे त्यांचे कौतुक होत आहे.