महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खारेबांद येथील बेकायदा कत्तलखान्याचा होणार तपास

06:22 AM Sep 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संशयिताच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी

Advertisement

प्रतिनिधी/ मडगाव

Advertisement

खारेबांद येथील बेकायदा कत्तलखान्याचा बजरंग दलाने पर्दाफाश केल्यानंतर मडगाव पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत. दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी अस्लम बेपारी तसेच त्याचा दोन मुलांनी व एका महिलने अटकपूर्व जामिनासाठी दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावर उद्या सोमवार दि. 30 रोजी सुनावणी होणार आहे.

या कत्तलखान्यावर जेव्हा छापा टाकण्यात आला तेव्हा, त्या ठिकाणी दोन बैल सापडून आले होते. त्या बैलाची ध्यान फांऊडेशनच्या मदतीने सुटका करण्यात आली होती. तसेच कत्तलीसाठी आणलेले दोन रेडे गायब झाले होते. या कत्तलखान्यात गुरांच्या चरबीने भरलेले तब्बल 41 डबे आढळून आले होते. तसेच गुरे कापण्यासाठी व चरबी काढण्यासाठी वापरली जाणारी शस्त्रे आढळून आली होती.

कत्तलखान्याला परवानगी होती का ?, होती तर त्याची कागदपत्रे सादर करण्यास संशयितांना सांगितले जाणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंत किती गुरांची कत्तल करण्यात आली, ही गुरे कुठून आणली जात होती, गुरे खरेदी करून आणली जायची की गुरांची चोरी केली जायची, तसेच गुरांची चरबी काढल्यानंतर ती कुठे पाठविली जायची. या चरबीचा कशासाठी वापर केला जायचा, चरबी कोण खरेदी करत होते, ज्या तीन मजली इमारतीत हा कत्तलखाना चालविला जात होता, त्या इमारतीची कागदपत्रेसुद्धा संशयिताकडून घेतली जाणार आहेत. या प्रकरणाच्या मूळापर्यंत मडगाव पोलीस जाणार असल्याची दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी माहिती दिली.

सध्या प्रकरणातील संशयित फरारी असले तरी पोलिसांच्या तपासकामात अडथळा येणार नाही. संशयिताने जामिनासाठी अर्ज केलाय, त्याला पोलीस विरोध करतीलच. या प्रकरणाचा सखोल तपास होईलच, असे अधीक्षक सावंत म्हणाल्या.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article