For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राधानगरीत बाऊझर्सद्वारे डिझेलची बेकायदेशीर विक्री

04:38 PM Dec 25, 2024 IST | Radhika Patil
राधानगरीत बाऊझर्सद्वारे डिझेलची बेकायदेशीर विक्री
Illegal sale of diesel by bowsers in Radhanagar
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

राधानगरी तालुक्यातील एका खाजगी साखर कारखान्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर एक खाजगी पेट्रोल पंप आहे. या पंपासाठी संबंधित पेट्रोलियम कंपनीने बाऊझर्स (टैंकर) दिला आहे. या बाऊझर्सद्वारे स्थिर उपकरणे, अवजड यंत्रसामग्री, आणि अवजड वाहनांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन डिझेल पुरविणे कायदेशीर बंधनकारक आहे. पण या राधानगरीतील या बाऊझर्सकडून खुलेआम ट्रॅक्टर, ट्रक आदी वाहनांमध्ये डिझेल भरले जाते. विशेष बाब म्हणजे संबंधित कारखाना प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून या बाऊझर्समधूनच कारखान्याच्या वाहतुकीसाठी असलेल्या वाहनांमध्ये डिझेल भरावे असा अलिखित फतवा काढला आहे. त्यामुळे संबंधित वाहनधारकांना नाईलाजास्तव त्यामधून डिझेल भरून घ्यावे लागत आहे. त्यामुळे बाऊझर्सद्वारे सुरु असलेल्या या बेकायदेशीर डिझेल विक्रीची जिल्हा पुरवठा विभागाने सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरीकांतून होत आहे.

बाउझर्सद्वारे डिझेलची डिलिव्हरी करणे आणि बाउझर्सकडून जेरी कॅनमध्ये डिझेल भरले जात असल्याच्या शासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शासनाकडून बाऊझर्सच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली. त्यानुसार बाऊझर्सद्वारे केवळ स्थिर उपकरणे, अवजड यंत्रसामग्री आणि अवजड वाहनांच्या ऑनसाइट इंधन भरण्यासाठी बाऊझर्सचा वापर केला जाईल. त्यामधून तीन चाकी, चारचाकी, ट्रक, बस, टँकर आदींना डिझेल विक्री करू नये असे केंद्र शासनाच्या पेट्रोलियम विभागाच्या परिपत्रकात नमूद आहे. तरीही पेट्रोलियम नियम आणि परवान्याच्या अटींचे उल्लंघन करून बाऊझर्सद्वारे डिझेलची विक्री केल्याची कोणतीही तक्रार प ाप्त झाल्यास, परवान्याची प्रतीसह सदरची तक्रार त्वरीत संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी, तेल विपणन कंपन्या आणि स्थानिक पोलीस ठाण्याकडे ईमेलद्वारे पाठवण्याची तरतूद आहे. त्यानुसार जिल्हा प्राधिकरणाकडून तक्रारीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी जीपीएस प्रणालीमध्ये नोंदवलेल्या तपशिलांची तात्काळ तपासणी केली जाते. जर ती तक्रार खरी आढळली तर, पेट्रोलियम नियम, २००२ च्या संबंधित तरतुदींनुसार परवाना निलंबित, रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते.

Advertisement

                        जिल्हा पुरवठा विभागाकडून कारवाई होणार काय ?

केंद्र शासनाच्या पेट्रोलियम विभागाकडून बाऊझर्सच्या वापरासाठी सुस्पष्ट असे नियम निश्चित केले असले तरी देखील त्याचे बिनदिक्कतपणे उल्लंघन करून राधानगरीतील बाऊझर्सकडून खुलेआम डिझेलची विक्री केली जात आहे. त्याबाबत स्थानिक नागरीकांसह त्याच्यामधून डिझेल भरण्याची सक्ती केली जाणाऱ्या संबंधित खाजगी कारखान्याच्या वाहनधारकांतूनही मोठ्या तक्रारी आहेत. पण पुरवठा विभाग या सर्व प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्यामुळे कारवाई कोण करणार ? हा यक्षप्रश्न आहे.

                             बाऊझर्समधूनच ऊस वाहतुकीच्या वाहनात डिझेल भरा

राधानगरीतील एका खाजगी साखर कारखान्याकडे ऊस वाहतुकीसाठी आमचा ट्रॅक्टर आहे. त्यामध्ये संबंधित पेट्रोलपंपाच्या बाऊझर्समधूनच डिझेल भरावे अशी सक्ती संबंधित कारखाना प्रशासनाकडून केली जात आहे. पण त्याच्याऐवजी पेट्रोल पंपामधूनच डिझेल देण्याची आमची मागणी असल्याचे ऊस ओढणीसाठी असलेल्या एका वाहनधारकाने सांगितले.

Advertisement
Tags :

.