For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेंगुर्ल्यात 60 लाखाची बेकायदा दारु जप्त

03:31 PM Jun 17, 2025 IST | अनुजा कुडतरकर
वेंगुर्ल्यात 60 लाखाची बेकायदा दारु जप्त
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
राजस्थान, सुरखंडा खेडा येथील धर्मेशकुमार पुरुषोत्तम चोबीसा (४४) याला मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला मठ तिठा (मठ चेकपोस्ट नजीक) 60 लाख रुपयाची गोवा बनावटीची दारू बिगर परवाना आयशर टेम्पोमधून वाहतूक करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पोलीस पथकाने रंगेहाथ पकडले. गोवा बनावटीच्या दारूसह आयशर टेम्पो ताब्यात घेण्यात आला असून वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पोलीस पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. यातील आयशर टेम्पो नं. युपी.-२१-ईटी-००४१ हा माल वाहक टेम्पो माल भरून जात होता. या टेम्पोची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची रॉयल ब्ल्यू व्हिस्की असे लेबल असलेले १८० मिली मापाच्या ४८ बाटल्यांचा बॉक्स प्रती बॉटल किंमत रू १०० प्रमाणे ८०० मुठ्ठयाचे बॉक्स सुमारे किंमत रू ३८,४०,००० तसेच देशी दारु टँगो पंच असे लेबल असलेले ९० मिली मापाच्या १०० बाटल्या प्रती बॉटल रू ५० प्रमाणे असलेले २५० बॉक्स असे सुमारे किंमत १२,५०,००० असे मिळून एकूण दारू मद्देमाल रू ५०,९०,००० चा मुद्देमाल गाडीत आढळून आला. या मालासह सुमारे २० लाख किंमतीचा तपकिरी रंगाचा आयशर टेम्पो असा एकूण ७०,९०,००० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागचे पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल प्रकाश कदम, डॉमनीक डिसोजा, बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोझा, जॅक्शन गोन्सालवीस, पोलीस कॉन्स्टेबल अमय कांडर, वेंगुर्ले पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड व हेड कॉन्स्टेबल योगेश राऊळ आदी पथकाने केली. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीसात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे आरोपी धर्मेशकुमार पुरुषोत्तम चोबीसा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.