राजापुरात 92 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
लांजा :
राजापूर बसस्थानकासमोर राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबईच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत आयशर टेम्पोमधून अवैधरित्या नेण्यात येत असलेला लाखो ऊपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा पकडण्यात आला. यात मद्यसाठा, मोबाईल आणि वाहतुकीसाठी वापरलेला आयशर टेम्पो असा एकूण 1 कोटी 14 लाख 9 हजार ऊपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुऊवारी सकाळी 9 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवा येथून आयशर टेम्पोमधून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होत असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबईच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने गुऊवारी सकाळपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर एसटी बसस्थानकासमोर सापळा रचला होता. अशातच सकाळी 9 च्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो (जीजे 16 एयु 6838) थांबवण्यात आला. त्यानंतर या टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोच्या पाठीमागील हौद्यामध्ये ठेवलेला गोवा बनावटीचा विदेशी मद्याचा साठा आढळला. यामध्ये एव्हरग्रीन रिझर्व व्हिस्की 750 मिलीच्या 4 हजार 800 बॉटल, रॉयल ब्लॅक अॅपल व्होडका 750 मिलीच्या 4 हजार 800 बॉटल तसेच किंगफिशर स्ट्रॉंग व्हिस्की 500 मिलीचे 50 बॉक्स इत्यादी विदेशी मद्याची किंमत 92 लाख 4 हजार ऊपये इतकी आहे. या मद्याची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोची किंमत 22 लाख ऊपये तसेच टेम्पो चालकाकडे असणारा रेडमी कंपनीचा मोबाईल अंदाजे 5 हजार ऊपये किंमतीचा असा एकूण 1 कोटी 14 लाख 9 हजार ऊपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबईच्या भरारी पथकाने जप्त केला.
आयशर टेम्पोचालकाचे नाव साहील कमऊ खान (24, रा. हरियाणा) असे असून विनापरवाना विदेशी गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी त्याच्याविऊद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 अ व इ, 81, 83 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईवेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक मुंबईचे दुय्यम निरीक्षक सतीश इंगळे आदींसह त्यांचे सहकारी उपस्थित होते.