कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजापुरात 2 कोटीचा अवैध मद्यसाठा जप्त

11:44 AM Sep 03, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

लांजा :

Advertisement

राजापूर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर पन्हाळे तर्फे सौंदळ येथील निनादेवी मंदिरनजीक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने गोवा येथून मुंबईला जाणाऱ्या दहाचाकी ट्रकमधील 2 कोटी 11 लाख 72 हजार 280 रुपये किंममतीचे गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 1866 बॉक्स आणि 25 लाख रुपये किंमतीचा दहाचाकी कंटेनर जप्त केला. सोमवारी सकाळी 11.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कंटेनर चालक आसिफ आस मोहम्मद याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ए), (ई), 81, 83 व 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

ट्रकमधून गोवा बनावटीच्या दाऊची वाहतूक केली जात असल्याची खबर भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पाळत ठेवून विनापरवाना विदेशी मद्याची वाहतूक करणारा दहाचाकी ट्रक (आरजे 14 जीके 9464) पकडला. ही संपूर्ण कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सहआयुक्त प्रसाद सुर्वे, उप अधीक्षक रवींद्र उगले तसेच निरीक्षक रियाज खान आणि विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या गुह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. आर. गायकवाड हे करत असून फिर्यादी जवान अमोल चौगुले आहेत. या कारवाईत दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर, जवान चंदन पंडीत, रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक अमित पडळकर, जवान नीलेश तुपे, जवान-वाहक चालक मलिक धोत्रे आदी सहभागी होते. अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 833 3333 यासह दूरध्वनी क्रमांक 022-22663881 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article