कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडीत साडे अकरा लाखाची अवैध दारू ताब्यात

04:52 PM Oct 12, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

दोघांना अटक ; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

Advertisement

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रविवार सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गोवा बनावटीची अवैध दारू आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली आलिशान कार असा एकूण ११ लाख ६७ हजार ४००/- (अकरा लाख सदूसष्ठ हजार चारशे रुपये) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अजित सुखदेव जगताप, रा. मोहोळ., पुंडलिक नामदेव बाबर, रा. पंढरपूर. या दोघांना अटक करण्यात आली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज सकाळी ०७:१५ वाजताच्या सुमारास आंबोली ते सावंतवाडी रोडवर सापळा रचला. यावेळी दारूची अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी ​१,६७,४००/- (एक लाख सदूसष्ठ हजार चारशे रुपये) किमतीची गोवा बनावटीची दारू. व ​१०,००,०००/- (दहा लाख रुपये) किमतीची दारू वाहतुकीसाठी वापरलेली महिंद्रा XUV 500 कार.​एकूण जप्त मुद्देमाल: ११,६७,४००/- रुपयेचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.सदर कारवाई अधीक्षक मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली ​स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस अंमलदार/अमर कांडर, महेश्वर समजिसकर यांच्या पथकाने केली.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article