कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विदेशी चलनाची बेकायदा देवाणघेवाण

07:35 AM Oct 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोव्यातून हलविली जातात मुख्य सूत्रे : भटकळ पोलिसांची कारवाई

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

विदेशी चलनाची बेकायदा देवाणघेवाण मोठ्याप्रमाणात होत असून या अवैध चलनाची सूत्रे थेट गोव्यातील मडगाव येथून हलवली जात असल्याचे उघड झाले आहे. याबाबत भटकळ पोलिसांनी बनावट अमेरिकन डॉलरची बेकायदा देवाणघेवाण करणाऱ्या एका मोठ्या एक्सचेंज रॅकेटचा पर्दाफाश करून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

भटकळ रेल्वे स्थानकाजवळ ही कारवाई करण्यात आली. ऊक्सुद्दीन सुलतान बाशा (वय 62), रा. भटकळ (मुस्का स्ट्रीट) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ऊक्सुद्दीनकडून सुमारे 7 लाख 30 हजार 800 ऊपये किमतीचे बेकायदेशीर अमेरिकन डॉलर्स जप्त केले आहेत. अटक केल्यानंतर झालेल्या चौकशीत त्याने हे डॉलर स्थानिक रहिवासी असलेल्या कपा मुझीब याला देण्यासाठी स्कूटरवरून नेत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी मुझीबचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये 100 डॉलर्स मूल्याच्या 14 नोटा आणि 50 डॉलर्स मूल्याच्या 156 नोटा, असा एकूण 172 डॉलर्सचा म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 8 लाख ऊपये किमतीचा बनावट चलन साठा जप्त केला आहे. संशयित ऊक्सुद्दीन हा गोव्यातून ट्रॅव्हल एजंट्स आणि परदेशी पर्यटकांकडून डॉलर्स मिळवत होता आणि तपास यंत्रणांना चुकवण्यासाठी ही रक्कम स्कूटरसारख्या दुचाकी वाहनातून भटकळला आणत होता. भटकळ पोलिसांनी केलेल्या तपासातून अवैध चलनाचा गोव्यापर्यंत विस्तारलेला मोठा नेटवर्क उघड झाला आहे.

भटकळ शहर पोलिस स्थानकाचे सीपीआय दिवाकर पी.एम. यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ऊक्सुद्दीन आणि मुझीब यांच्याविऊद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमधील अन्य लोकांचा आणि या अवैध व्यवसायाच्या संपूर्ण विस्ताराचा तपास पोलिस करत आहेत. जप्त केलेले चलन पुढील चौकशीसाठी सीमाशुल्क (कस्टम्स) अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

 

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article