For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गाजियाबादमध्ये आलिशान बंगल्यात अवैध दूतावास

11:42 PM Jul 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
गाजियाबादमध्ये आलिशान बंगल्यात अवैध दूतावास
Advertisement

तोतया राजदूताला अटक : आलिशान कार, विदेशी चलन हस्तगत

Advertisement

वृत्तसंस्था/ गाजियाबाद

उत्तरप्रदेशच्या गाजियाबाद येथून एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) गाजियाबादच्या कविनगर येथे चालविल्या जाणाऱ्या अवैध दूतावासाचा भांडाफोड केला आहे. एसटीएफने अवैध दूतावासाचे संचालन करणारा आरोपी हर्षवर्धन याला अटक केली आहे. हर्षवर्धन जैन स्वत:ला वेस्ट आर्क्टिका, सबोरगा, पॉल्विया आणि लॉडोनिया देशांचा राजदूत म्हणवून घ्यायचा. प्रत्यक्षात या नावाचे देश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीकडून विदेशी राजनयिकांसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे अनेक नंबरप्लेट्स देखील हस्तगत झाले आहेत.

Advertisement

हर्षवर्धन जैनचा याचे चंद्रास्वामी आणि आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र दलाल अदनान खगोशीशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. आरोपीकडून चार डिप्लोमॅटिक नंबरप्लेट असलेली आलिशान वाहने, मायक्रोनेशन देशांचे 12 डिप्लोमॅटिक पासपोर्ट, विदेश मंत्रालयाची मोहोर उमटविलेले दस्तऐवज, दोन बनावट पॅनकार्ड, 47.70 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसोबतचे छायाचित्र दाखवून तो लोकांना विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवत होता.

अवैध सॅटेलाइट फोन बाळगल्याप्रकरणी 2011 मध्ये हर्षवर्धनच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता. हर्षवर्धन हा लोकांची फसवणूक करण्यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती आणि अन्य व्हीआयपी व्यक्तींसोबतच्या मॉर्फ केलेल्या छायाचित्रांचा वापर करत होता. विदेशात काम मिळवून देण्याच्या नावाखाली तो लोकांकडून पैसे उकळत होता. तसेच बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हवाला व्यवहार करत होता.

आरोपीने गाजियाबाद येथे एक बंगला भाड्याने घेत तेथे वेस्ट आर्क्टिका एम्बेसी नावाने बनावट दूतावास उघडला होता. हर्षवर्धनचे नेटवर्क कुठपर्यंत फैलावलेले आहे आणि आतापर्यंत त्याने किती लोकांची फसवणूक केली आहे याचा तपास आता पोलीस आणि तपास यंत्रणा करत आहेत.

Advertisement
Tags :

.